शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : अवैध गर्भपात प्रकरणात जामीन फेटाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:13 IST

मलकापूर : जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याचे प्रकार वाढलेले असून, डिसेंबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर बुलडाणा व डॉ. ब्रिजलाल सुपडा चव्हाण धामणगाव बढे व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली होती. 

ठळक मुद्देआरोपीमध्ये डॉक्टरांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याचे प्रकार वाढलेले असून, डिसेंबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर बुलडाणा व डॉ. ब्रिजलाल सुपडा चव्हाण धामणगाव बढे व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली होती. त्यावरून पो.स्टे. बोराखेडी यांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपी डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर व डॉ.ब्रिजलाल सुपडा चव्हाण यांना अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक केलेली होती. सदर आरोपी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन मिळण्यास अर्ज केलेला होता. सदर जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे.डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर व डॉ.ब्रिजलाल सुपडा चव्हाण यांनी एका महिलेचा अवैध गर्भपात करीत असताना सदर महिलेच्या पोटात अर्भक राहिल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यावेळी सदर महिलेस अकोला येथील नामवंत हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सदर हॉस्पिटल प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सदर अवैध गर्भपाताबाबत माहिती कळविली होती. त्यावरून जिल्हा शिल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर व डॉ.ब्रिजलाल सुपडा चव्हाण व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून पो.स्टे. बोराखेडी येथे विविध कायद्यांच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर प्रकरणातील आरोपी डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर यांच्या अटकेनंतर तपास कामी पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन मिळण्याकरिता केलेला अर्ज वि. न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी कोर्ट मोताळा यांनी फेटाळला होता. त्यानंतर आरोपी डॉ. आबिद हुसेन सैयद नाजीर यांनी जामीन मिळण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर येथे अर्ज केलेला होता. सदरच्या जामीन अर्जाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. पाटील यांच्या न्यायालयात ६ फेब्रुवारी २0१८ रोजी पूर्ण झाली. सदरच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे विवेक मा. बापट सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून वि. न्यायालयाने आरोपी डॉ. आबिद हुसेन सैयद नाजीर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.  गुन्ह्याचा तपास बोराखेडी पोलीस स्टेशन ऑफिसर भामरे हे करीत आहेत.  गुन्ह्यातील अन्य आरोपी सूरत येथील डॉक्टर तसेच सदर डॉक्टरचा स्थानिक सूत्रधार एजंट फरार असून, त्याच्या अटकेकरिता तपास पथक करण्यात आलेले आहे. या प्रकरणातील अन्य सूत्रधारांचा शोध सुरू असून, आणखी काही मंडळी यामध्ये पकडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAbortionगर्भपातCrimeगुन्हा