शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरः  वीजपुरवठा बंद असल्याने शेतकरी संतप्त; महावितरण कार्यलयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:38 IST

पिकांचे नुकसान होत असल्याने आज मंगळवारी सकाळी १०.३० वीजकंपनीच्या एमआयडीसी कार्यालयात राडा घातल्याची घातला

मलकापूरः आठदिवसापासून वीजपुरवठा बंद असल्याने मलकापूर तालुक्यातील पाच गावातील संतप्त शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होत असल्याने आज मंगळवारी सकाळी १०.३० वीजकंपनीच्या एमआयडीसी कार्यालयात राडा घातल्याची घातला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे यांच्या मध्यस्थीने शेतकरी शांत झाले.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,तालुक्यातील वाघोळा,चिंचोल,कोरवाड,दुधलगांव,ददसरखेड अशा पाच गावात विजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना गहू, हरबरा या पिकांची वाढ करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवात संतप्त भावना आहेत.आज सकाळी संतप्त शेतकरी सरपंच संघटना अध्यक्ष रामराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजकंपनीच्या मलकापूर एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले.त्यांनी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोटपोट,शिवीगाळ करीत तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, विजकंपनीचे कार्यकारी अभियंता साळी,उपविभागीय अभियंता अनिल शेगावकर,अभियंता चौधरी हे देखील दाखल झाले.संतप्त शेतकरी व वीजकंपनीचे  अधिकारी व कर्मचारी यांच्यात संतोषराव रायपूरे यांनी मध्यस्थी केली.पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी संवाद साधून त्यांनी ३५ पोलचा विषय डिपीडीसी च्या माध्यमातून सोडविण्यासंबंधी आश्चस्त  करून वाद संपुष्टात आणला. त्यानंतर  विनोद कारंजकर ,गणेश सपकाळ, रमेश जैस्वाल, निलेश अहीर,मंगेश टाकरखेडे,नितीन पाचपोर,विलास कांडेलकर,योगेश चोपडे, मोहन गावंडे,आदीसह संतप्त शेतकरी शांत झाले. दरम्यान एमआयडीसी पोलिसही घटनास्थळी दाखल झाली होती.

टॅग्स :MalkapurमलकापूरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी