शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : राष्ट्रीयकृत बँकांसमोर मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 16:14 IST

शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर मात्र सद्यस्थितीत मोठी गर्दी नजरेस पडत आहे

-  मनोज पाटीलमलकापूर : सर्वत्र लॉक डाऊन असतानाही शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर मात्र सद्यस्थितीत मोठी गर्दी नजरेस पडत आहे.अनुदानाचे हजार रुपये काढण्यासाठी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे अपंग, विधवा, व ६५ वर्षावरील वयोवृद्ध लाभार्थ्यांची ही गर्दी आहे. बंदमुळे कुणाला पैशाची अडचण आहे तर कुणाला औषध आणायला पैसे नाहीत अशी गर्दीतील लोकांची व्यथाही समोर आली.                     संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील अपंग, विधवा व ६५ वर्षावरील वयोवृद्ध यांना मिळणारे प्रतिमाह हजार रुपये अनुदान सद्यस्थितीत त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. सदर अनुदानाचे पैसे काढण्याकरिता या लाभार्थ्यांची शहरातील व ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेसमोर एकच गर्दी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीचे सर्वत्र सावट आहे अशा परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला रोखण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.                                लाभार्थी रांगेत उभे असले तरी त्यांच्यामध्ये जे सुरक्षित असे सामाजिक अंतर असावे ते मात्र दिसून आले नाही. त्यामुळे जिवाच्या भीतीपेक्षाही त्यांना पोटाची भूक मोठी होती की आपले अनुदान मिळवण्याकरिता त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसावे ? अशी वास्तव परिस्थिती या गर्दीमुळे दिसून आली. गर्दीमुळे बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन बँकेच्या आत सोशल डिस्टन्स ठेवले जात आहे मात्र बाहेर कसल्याच प्रकारचे सोशल डिस्टन्स असल्याचे दिसत नाही.                   या गर्दीतील लाभार्थ्यांना तुम्हाला कोरोनाची भीती नाही का ? असा प्रश्न सुरक्षित अंतर ठेवून केला असता, भीती तर आहे आम्हाला! पण आमच्या दैनंदिन गरजेचे करायचे तरी काय? भीतीने आमची गरज भागणार आहे का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला. त्यासंदर्भात इतरांशी चर्चा केली असता कुणाला घरात गहू, तांदळा शिवाय इतर लागणारे साहित्य आणण्याकरिता पैसे नाहीत. तर कुणाला औषधाला पैसे नाहीत. काही लोकांनी गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर तर आणून दिली पण बाकीचे साहित्य तर आम्हालाच उपलब्ध करायचे आहे ना ! पैसे नाहीत तर ते येणार तरी कुठून? त्यामुळेच आमच्या खात्यात आलेले पैसे आम्ही काढून लगेच घरी जाऊ असे उत्तरही काही लाभार्थ्यांनी दिले. दरम्यान लाॅक डाऊनमुळे त्यांना उद्भवलेल्या अडचणी सुद्धा प्रकर्षाने समोर आल्या. (प्रतिनिधी)

टॅग्स :Malkapurमलकापूरbankबँक