लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : ओव्हरटेक करण्याच्या नादात अज्ञात लक्झरीच्या मागील भागाचा डोक्याला जबर फटका बसल्याने २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बुलडाणा रस्त्यावरील मौजे वाकोडी फाट्यावर घडली. यासंदर्भात अधिक माहिती अशी, योगेश किसन सुरळकर (वय २२) रा.निंबारी ता.मलकापूर हा युवक त्याची हिरोहोंडा क्र.एम.एच.२५/ए.डब्ल्यू.६९११ ने शहराकडे जात होता. अज्ञात भरधवा वेगाने त्याने टँक्टर व लक्सरीस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिली.या अपघातात योगेशच्या डोक्याला जबरदस्त फटका बसला परिणामी प्रचंड रक्तस्त्राव होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक याच परिसरातील असल्याने घटनेच्या अवघ्या पंधरा मिनीटात त्याची ओळख पटली. घटनेशी संबधीत इतर वाहने निघून गेली. त्याचा तपास पोलीस करीत आहेत.
मलकापूर : ओव्हरटेक करण्याच्या नादात युवकाचा जागीच मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:53 IST
मलकापूर : ओव्हरटेक करण्याच्या नादात अज्ञात लक्झरीच्या मागील भागाचा डोक्याला जबर फटका बसल्याने २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बुलडाणा रस्त्यावरील मौजे वाकोडी फाट्यावर घडली.
मलकापूर : ओव्हरटेक करण्याच्या नादात युवकाचा जागीच मृत्यू!
ठळक मुद्देबुलडाणा रस्त्यावरील मौजे वाकोडी फाट्यावर घडला अपघात