शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मलकापूर : हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:02 IST

मलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना  निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची  धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची  पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या  उत्तरार्धातच जलसाठय़ाची बिकट अवस्था म्हटल्यावर येत्या दोन  महिन्यांत शहरातील सुमारे एक लाख लोकांवर जलसंकट येण्याची श क्यता आहे. त्यामुळे देवा देवा करून तब्बल २0 वर्षांनंतर नियंत्रणात  आलेल्या पाणी पुरवठय़ावर आता गंडांतर येण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देमलकापूर पाणी पुरवठा योजना संकटात येण्याची शक्यता

हनुमान जगताप । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना  निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची  धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची  पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या  उत्तरार्धातच जलसाठय़ाची बिकट अवस्था म्हटल्यावर येत्या दोन  महिन्यांत शहरातील सुमारे एक लाख लोकांवर जलसंकट येण्याची श क्यता आहे. त्यामुळे देवा देवा करून तब्बल २0 वर्षांनंतर नियंत्रणात  आलेल्या पाणी पुरवठय़ावर आता गंडांतर येण्याचे संकेत आहेत.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की सन १९७८ साली धोपेश्‍वर येथून  कार्यान्वित वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. तांत्रिक  अडचणीमुळे पूर्णामायच्या पात्रातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर  आधारित या योजनेत अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठीच्या झळा स्थानीय  नागरिकांनी सोसल्या. गेली २0 वर्षे पंधरा-पंधरा दिवसांनी होणारा पाणी  पुरवठा देवा देवा करीत नियंत्रणात आला आहे. फेब्रुवारी १६ पासून चौ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कारण ११.५0 कोटींच्या  पाइपलाइनचा वापर सुरू झाला आहे.विद्यमान परिस्थितीत आलबेल चालू असताना फेब्रुवारीच्या मध्यावधी तच हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची धक्कादायक  माहिती आहे. म्हणजे ३८८ द.ल.घ.मी. क्षमतेच्या धरणात मृतसाठा  वगळता केवळ २१0 द.ल.घ.मी एवढा जलसाठा आहे. विशेष म्हणजे  या धरणावरच खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील ३२ मुख्य  योजनांसह लहान-मोठय़ा योजना कार्यान्वित आहेत. त्यात रेल्वे, वीज  प्रकल्प, साखर कारखाने, नगरपालिका, एमआयडीसी, ग्रामपंचायती  यांचा सामवेश आहे.  याच धरणावरून हजारोंच्या संख्येने अवैधरीत्या  पाणी उपसादेखील करण्यात येतो. त्यामुळे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच ६0  टक्क्यांवर आलेला जलसाठा किती काळ पुरणार, असा सवाल आता  उपस्थित होऊ लागला आहे. पर्यायाने पाण्याचे बाष्पीभवन आणि उपसा  अशा दोन प्रक्रियेत ‘त्या’ जलसाठय़ात घट येण्याची शक्यता आहे.  परिणामी, बॅकवॉटरची पातळी लक्षवेधी स्वरूपात कमी होऊन मलका पूरच्या एक लाख लोकांसाठीची पाणी पुरवठा योजना येत्या दोन  महिन्यांत संकटात येण्याचे संकेत आहेत. त्यावर उपाययोजनेची गरज  त्यानिमित्ताने प्रतिपादित होताना दिसत आहे.

ग्रामीण भागालाही झळ!मलकापूर तालुक्यात २२ गाव नळ योजना, वडोदा ५ गाव नळ योजना,  एमआयडीसी आदीसह विविध योजना हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर  आधारित आहेत. पर्यायाने सव्वालाख नागरिक त्या माध्यमातून  अडचणीत येण्याची भीती असून, ग्रामीण भागालाही त्यांच्या झळा  बसण्याचे संकेत आहेत.

अवैध उपशावर कारवाई व्हावी!हनतूर धरणाच्या जलसाठय़ातून मलकापूर पा.पु. योजनेपर्यंतच्या ११ कि  .मी. अंतरात शेकडो ठिकाणी पाण्याचा अवैधरीत्या उपसा केला जात  आहे. त्यावर अवैध पाणी उपसा समितीने चौकशी करून कारवाई  करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

विद्यमान परिस्थितीत हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्के आहे.  दरवर्षीप्रमाणे यंदाही आगामी पाणीटंचाई लक्षात घेऊन त्या उ पाययोजनांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्या-ज्या ठिकाणी सध्या  समस्या येत आहेत, त्या सोडविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत.  अडचण येऊ नये, आम्ही कार्यरत आहोत.- एस.आर.पाटील, सहायक अभियंता हतनूर प्रकल्प.

पाण्याअभावी मलकापूरकरांनी काय सोसलंय याची जाण आणि भान  आम्हाला आहे. त्यासाठीच आम्ही नवीन पाइपलाइनवर भर देऊन पाणी  पुरवठा आटोक्यात आणला. सद्यपरिस्थिती चांगली दिसते; मात्र येणार्‍या  काळात अडचण येऊ नये म्हणून हतनूर धरणाच्या पाण्यावर  आरक्षणाच्या रकमा भरल्या आहेत. जनतेने पाण्याचा योग्य वापर  करावा, अशी आमची विनंती आहे.- अँड. हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर.

टॅग्स :MalkapurमलकापूरbuldhanaबुलडाणाWaterपाणी