शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात दोन वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : दोन वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी घडली. कारने दोन ऑटोसह दुचाकीला दिलेल्या धडकेत आठ प्रवासी तर बसस्थानकावर ब्रेक फेल झाल्याने फलाटावरील खांबावर बस आदळून झालेल्या अपघातात बसमधील चिमुकल्यासह सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात ...

ठळक मुद्देकार-ऑटोच्या धडकेत आठ जखमीस्थानकात बस खांबाला धडकली, प्रवासी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : दोन वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी घडली. कारने दोन ऑटोसह दुचाकीला दिलेल्या धडकेत आठ प्रवासी तर बसस्थानकावर ब्रेक फेल झाल्याने फलाटावरील खांबावर बस आदळून झालेल्या अपघातात बसमधील चिमुकल्यासह सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मारुती अर्टीका क्र.टी.एस.0८/एफ क्यू.५८१७ ही गाडी भरधाव वेगात मुंबईकडे जात होती. महावितरण सबस्टेशनजवळ तिने विरुद्ध दिशेने येत असलेल्या ऑटोरिक्षा क्र.एम.एच.१९-बी.यू.१७४४ यांसह त्याच्या पाठीमागील विनानंबरच्या ऑटोरिक्षाला व मोटारसायकलीला उडविले. एक ऑटो मौजे नरवेल तर एक मौजे हरसोडा येथून मलकापूरकडे येत होता. या विचित्र अपघातात मोटारसायकलस्वार विजय निनू पाटील (वय ५३) रा.धामणगाव, व्दारकाबाई लक्ष्मण हेलोडे (वय ७0), धोंडू चंदु पाटील (वय ७२), नंदु नीळकंठ सातव (वय ३0), विजय उखर्डा इंगळे (वय ३२) सर्व रा.नरवेल, संजय हरिभाऊ मोरे (वय ३५) रा.हरसोडा, कांचन संतोष माने (वय १८), सखुबाई संतोष माने (वय ३२) रा.काळेगाव असे आठ जण जखमी झाले. जखमींपैकी ५ रुग्णांवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात तर तीन रुग्णांवर कोलते हॉस्पिटलात उपचार करण्यात आले. रुग्णांची प्रकृती सुखरूप असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. मलकापूर तालुक्यात या आठवड्यात सलग दुसर्‍या दिवशी अपघाताच्या घटना घडत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाकडून रुग्णांना वेळेवर उपचार सुविधा मिळत असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांनी लोकमतशी बोलताना दिली. दुसरीकडे मलकापूर परिसरात गेल्या महिनाभरापासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची त्वरेने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.  

ब्रेक फेल झाल्याने स्थानकातील खांबावर धडकली बसबसचे ब्रेकफेल झाल्याने बस स्थानकातील खांबावर जोरदार धडकली. त्यात सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता  घडली. मलकापूर आगाराची बस क्रमांक एमएच ४0 - एन ८0९0 सकाळी ६ वाजता नरवेल येथून मलकापूर बसस्थानकावर पोहोचली. चालकाने शेवटी बस थांबविण्यासाठी ब्रेक दाबले असता, ब्रेक लागले नाहीत. बस वेगाने बसस्थानकावर घुसली. त्यात बस खांबावर धडकली. बसमधील भीवसेन आनंदा रावळकर (वय ५८), रमेश विष्णू चव्हाण (वय ६0), शुभांगी प्रभाकर चंदनकार (वय १२), प्रतीक्षा मोहन सावळे (वय १२), कार्तिक मधुकर कोलते (वय १२), वैभव राजेंद्र बर्‍हाटे (वय १२) असे सहा प्रवासी जखमी झाले. जखमी विद्यार्थिनींच्या फोनवरून नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ, पत्रकार वीरसिंह राजपूत आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

टॅग्स :Accidentअपघातmalkapur bypassमलकापूर बायपास