शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

जिल्ह्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:57 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी जास्त येणारा पाऊस व दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे ‘व्हायरल’च्या रुग्णांत वाढ झाली आहे. तसेच मलेरियाचे १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील आठ रुग्ण जुलै महिन्यात आढळले आहेत. 

ठळक मुद्दे१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; ‘व्हायरल’चा प्रकोपही वाढला!डेंग्यूचा एक रुग्ण आढळला! वातावरण विषाणूंसाठी पोषक!

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी जास्त येणारा पाऊस व दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे ‘व्हायरल’च्या रुग्णांत वाढ झाली आहे. तसेच मलेरियाचे १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील आठ रुग्ण जुलै महिन्यात आढळले आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून व्हायरलचा प्रकोप वाढला असून, मलेरिया, डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. दिवसा ऊन-पाऊस आणि सकाळ-सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. खासगी हॉस्पिटलसह जिल्हा सामान्य रुग्णालयात  खोकला, ताप आणि श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. मागील वर्षी सन २0१६ मध्ये ४ लाख ७९ हजार २६७ रक्त नमुने तपासण्यात आले होते. त्यात ६४ मलेरियाचे रुग्ण आढळले होते, तर यावर्षी मागील सात महिन्यात जानेवारी ते जुलै २0१७ मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून २ लाख ४६ हजार ९८३ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली.  त्यात मलेरियाचे १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील जुलै महिन्यात आठ रुग्ण आढळल्यामुळे  आरोग्य तसेच जिल्हा हिवताप कार्यालयाकडून मार्गदर्शन व आवश्यक तेथे उपाययोजना करून उपचार करण्यात येत आहेत. जुलै महिन्यात तापाच्या वाढल्या रुग्णांची संख्या पाहता ग्रामीण भागात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

वातावरण विषाणूंसाठी पोषकऋतू बदलल्याने सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोकेवर काढले आहे. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले, तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण विषाणूंसाठी पोषक आहे. विशेषत: पावसाच्या उघडझापमुळे शरीरावर याचा प्रभाव पडतो. लहान मुलांवर याचा परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे व्हायरलचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या शिवाय पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी तयार होऊन डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने कीटकजन्य आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत.

डेंग्यूचा एक रुग्ण आढळला!मागील वर्षी ६५ संशयित डेंग्यूच्या रूग्णांपैकी पाच रुग्ण आढळले होते.  यावर्षी जानेवारी ते जुलै २0१७ दरम्यान आठ संशयित रुग्णांपैकी १ रुग्ण डेंग्यूचा आढळला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. 

पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचून विविध जलजन्य आजारात वाढ होत असते. याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून नियमित रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी काळजी घेऊन आपल्या परिसरातील साचलेले डबके, टाक्या स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. तसेच ताप आल्यास त्वरित रक्त नमुने देणे आवश्यक आहे.-एस.बी. चव्हाण,  जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.