लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांसह जिल्ह्यातील १५ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, येत्या काही दिवसात जिल्हा पाेलीस दलात माेठे फेरबदल हाेणार आहेत. दाेन अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्यात ११ पाेलीस अधिकारी येणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख महेंद्र देशमुख, संग्राम पाटील यांच्यासह जिल्ह्यातील १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक पाेलीस निरीक्षकांमध्ये विक्रांत पाटील, जनार्दन शेवाळे, मालती कायटे यांची बदली झाली आहे.तर सतीश आडे, अभिजीत अहिरराव, सुनिल साेळुंके, प्रमाेद पाचकवडे आदींची जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. उपनिरीक्षकांमध्ये संताेष आघाव, मुकुंद देशमुख, सुलभा ढाेले, याेगेश जाधव, अजहर नसीर शेख, रामेश्वर कांडुरे, घनश्याम पाटील, दिलीप पाटील, भाष्कर तायडे, मनाेज सुरवाडे, आदी अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली झाली आहे. तसेच आशिष गंद्रे, जयसिंग पाटील, रणजितसिंह ठाकूर, निलेश शेळके, विजयकुमार घुले, श्रीकांत रामराव जिदमवार आणि विलास इंगळे आदींची जिल्ह्यात बदली झाली आहे.
बुलडाणा पाेलीस दलात माेठे फेरबदल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:04 IST