शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मैत्रेय घोटाळा; बुलडाणा जिल्ह्यातील व्याप्ती ९८ कोटींच्या घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:18 IST

आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार १६८ ठेवीदारांची यामध्ये फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाच वर्षांत दामदुपटीसह विविध स्वरूपाच्या स्किम आणून ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यात सक्तवसुली संचालनालयाच्या निर्देशानुसार आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार १६८ ठेवीदारांची यामध्ये फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. जवळपास ९८ कोटी रुपयांपर्यंत ही फसवणूक झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, सन २०१६ पासून बुलडाणा पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असून, राज्यात या प्रकरणी जवळपास ३२ ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील ठेवीदारांची ९८ कोटी रुपयांनी यात फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ६९ कोटी ४५ लाख ७४ हजार २८६ रुपये ठेवीदारांनी यात गुंतवले असल्याचा लेखाजोखा आर्थिक गुन्हे शाखेने मिळविला आहे. यामध्ये आणखी काही ठेवीदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यापैकी २३ हजार ठेवीदारांची माहिती ही आतापर्यंत संगणकीकृत करण्यात आली आहे. मैत्रेय घोटाळ््याची व्याप्ती मोठी असून, त्या दृष्टीने आर्थिक गुन्हे शाखा ईडीच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करत आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणात २२ जुलै २०१५ पूर्वी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात कंपनीची मालमत्ता कोठे कोठे आहे, याचा शोध घेण्याचेही निर्देश देण्यात आले होते. त्यानुषंगाने राज्यातील विविध युनिट त्याचा शोध घेत आहेत. यामध्ये बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील मालमत्तेचा शोध घेतला असून, त्याचा अहवालही या प्रकरणामध्ये व्हिजिलिंग करणाऱ्या मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांकडे मध्यंतरी सादर केला आहे. दुसरीकडे या कंपनीची मध्य प्रदेशासोबतच महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यातही मालमत्ता असण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीेने सध्या यंत्रणा कार्यरत आहे. या प्रकरणात वर्षा मधुसूदन सत्पाळकर सह अन्य व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. आता वरिष्ठस्तरावर या प्रकरणी काय निर्णय घेतला जातो तथा न्यायालय काय सूचना देते, त्यावर पुढील बाबी अवलंबून राहतील; मात्र ढोबळमानाने कंपनीच्या मिळालेल्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्याचा प्रयत्न होईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. एमपीआयडीचेही कलम समाविष्टया प्रकरणात अलीकडील काळात तपासादरम्यान एमपीआयडी २०१२ (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण कायदा) मधील काही कलमांचाही अंतर्भाव केला आहे. त्या दृष्टीने कायदेशीर कार्यवाही येत्या काळात केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.छिंदवाड्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्तामध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मैत्रेय कंपनीची मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. या जिल्ह्यात १,२०० एकर शेती असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रत्यक्ष तेथे जाऊन मिळविलेल्या माहितीच्या आधारावर स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या कंपनीची एकंदरीत १९ हजार एकर शेती असून, प्लॉटिंग व्यवसायासाठी तिचा वापर केला जाणार होता, असे समोर येत आहे. या पैकी छिंदवाडा येथील १,२०० एकर जमिनीची कागदपत्रेही बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेने मिळवली असून, ती अप्पर पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आली असल्याचे सूत्र सांगत आहेत. राज्यातील वेगवेगळ््या युनिटला या कंपनीची मालमत्ता कोठे कोठे आहे, याचा शोध घेण्याचे मध्यंतरी निर्देश देण्यात आले होते. त्यानुषंगाने ही माहिती संकलित केल्या जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार १६८ ठेवीदारांनी या कंपनीत ६९ कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये गुंतवले असल्याचे आमच्या तपासात समोर आले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या निर्देशानुसार तथा सूचनेनुसार या प्रकरणात आम्ही तपास करत आहोत.- एम.एम. बोडके, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfraudधोकेबाजी