शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

By निलेश जोशी | Updated: October 5, 2023 18:07 IST

भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

बुलढाणा : जागतिक स्तरावर तिरंदाजीमध्ये एक महाशक्ती म्हणून भारताचा संघ सध्या लौकिक पावत असून ५ ऑक्टोबर रोजी भारतीय तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली कामगिरी ही देशाच्या दृष्टीने जशी ऐतिहासिक आहे तशीच ती महाराष्ट्राच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरली आहे. कारण भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

त्यातच ४ ऑक्टोबरला नागपूरच्या अेाजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कम्पाऊंट मिश्र प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरेल आहे. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारतीय तिरंदाजी संघात संचारलेला उत्साह पाहता ५ ऑक्टोबर रोजी भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजांनी कमाल करत सुवर्ण पटकावले. त्यामुळे तिरंदाजीच्या दृष्टीने ५ ऑक्टोबरचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा विचार करता या संघात महाराष्ट्रातील महिला व पुरुष मिळून तीन खेळाडू सहभागी आहेत. 

सुवर्ण पदकाच्या कमाईत त्यांचे योगदान हे ऐतिहासिक असून महाराष्ट्राच्या तिरंदाजीच्या इतिहासातील हे एक सुवर्ण पान म्हणावे लागले. यामध्ये साताऱ्याची सामान्य घरातून आलेली आदिती स्वामी, नागपूरचा अेाजस देवतळे आणि बुलढाण्याचा अगदीच सामान्य कुटुंबातून आलेला प्रथमेश जावकार यांचा समावेश आहे.कम्पाऊंड प्रकारात भारताचा संघ हा जागतिक क्रमावारीत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यासह अंतिम सामन्यातही पुरुष संघाने अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रात बुलढाणा, साताऱ्यासह नागपूरमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अेाजस देवतळेनेतर कमाल केली आहे. आतापर्यंत त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत दोन सुवर्णांची कमाई केली आहे. दरम्यान मिळालेले हे यश सांघिक कामगिरीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे भारताचे पुर्वाश्रमीचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांनी स्पष्ट केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. हे या मुलांनी सिद्ध केल्याचे ते म्हणाले.

 तिरंदाजीत भारताची आणखी दोन पदके निश्चित आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताची आणखी दोन पदके निश्चित झालेली आहे. ७ ऑक्टोबरला वैयक्तिक बाद फेरीचा अंतिम सामना आहे. गंमत म्हणजे यामध्ये भारताचा दिल्लीचा अभिषेक वर्मा आणि नागपूरच्या तेजस देवतळेमध्ये सुवर्ण पदकासाठी सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल दोघापैकी कोणाच्याही एकाच्या पक्षात गेला तरी भारतासाठी सुवर्ण आणि रजत पदक निश्चितच झालेले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Maharashtraमहाराष्ट्र