शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 17:44 IST

महाराष्ट्र बंद च्या हाकेला संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

संग्रामपूर: महाराष्ट्र बंद च्या हाकेला संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सोनाळा, पातुर्डा, वानखेड, वरवट बकाल, संग्रामपूर येथे कळकळीत बंद ठेवण्यात आला.  केंद्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली. परिणामी छोटे व मध्यम उद्योग बंद होत आहेत. युवकांना नोकऱ्या रोजगार प्राप्त होत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याने महागाई आभाळाला टेकली. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र शासन पूर्णपणे फेल ठरले आहे. केंद्र शासनाने संविधान विरोधी भूमिका घेत सुधारित नागरिकत्व कायदा अस्तित्वात आणून घटनाविरोधी धोरण अवलंबल्याने वंचित आघाडीचे सर्वासर्वो प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले. व त्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. वंचित आघाडी कडून पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील वरवट बकाल, पातुर्डा, संग्रामपूर, सोनाळा, वानखेड आदी गावांमधील प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाडण्यात आला. तर टुनकी, बावनबीर दोन गावात बंदला प्रतिसाद मिळाला नसून येथील प्रतिष्ठाने सुरूच होती. हे दोन गावे वगळता इतर ठिकाणी या बंदला विविध संघटनांसह व्यापाऱ्यांकडून पाठिंबा मिळाल्याने दि. 24 रोजी बंद शांततेत पार पडले आहे. तत्पूर्वी दि. 23 रोजी वंचित आघाडी कडून केंद्र शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संग्रामपूर तालुक्यात सोशल मीडिया तथा ठिकठिकाणी दवंडी देऊन प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रोजी बंदला प्रतिसाद मिळाले. यावेळी भारीपचे तालुका अध्यक्ष उत्तम उमाळे, ॲड पि. के. घाटे, गोपाल इंगळे, भगतसिंग पवार, अनिल सोनोने, बाळू इंगळे, पि.के. वानखडे, दीपक ससाने, वसूलकार काका, विशाल इंगळे, दयावंत इंगळे, सुभाष इंगळे, गजानन  तायडे, राजू तायडे, सुनील वानखडे, मोहन वानखडे, रोशन बेग मिर्जा, जाहेर अली, मुशीर अली, श्रीकृष्ण गावंडे, शेख अफरोज, जुनेद मिर्जा, मौलाना शकील, जहीर भाई,  शेख शकील, राज्जाक ठेकेदार, आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदSangrampurसंग्रामपूर