शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा बसस्थानकात प्रेमी युगलास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:03 IST

खामगाव : प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणाºया एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने धुलाई केली. ही घटना नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजताच्या घडली.

 लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणाºया एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने धुलाई केली. ही घटना नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजताच्या घडली. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेचा बघ्यांनी व्हिडीओही तयार केला. तर काहींनी हा व्हिडीओ चक्क सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे नांदुरा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

नांदुरा येथील महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी नियमित अपडाऊन करतात. यातील एक विद्यार्थीनी मंगळवारी दुपारी तिच्या मित्रासोबत गप्पा मारत होती. ही माहिती तिच्या घराकडील मंडळींना मिळाली. या माहितीच्या आधारे तिच्या नातेवाईकांनी बसस्थानक गाठले. दोघांनाही बोलताना रंगेहात पकडताच, दोघांनाही काही कळायच्या आत मारहाण करण्यास सुरूवात केली. मुलीसोबतच तिच्या सोबत बोलत असलेल्या युवकाचीही येथेच्छ धुलाई करण्यात आली. त्यानंतर मुलीचे नातेवाईक तिला घरी घेऊन गेले. या घटनेचे बघ्यांनी चित्रिकरणही केले. तर काहींनी लागलीच हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. याप्रकरणी नांदुरा पोलिसांमध्ये रात्री उशीरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

 

सामाजिक प्रतिष्ठेतून घडला प्रकार!

संबंधित मुलीच्या प्रेमप्रकरणाची भनक घरच्या मंडळीला लागली होती. त्यामुळे दोघांनाही यापूर्वी घरच्या मंडळींनी समज दिला होता. त्यानंतरही संबंधितांनी आपल्या वागणुकीत बदल केला नाही. त्यामुळे मुलीकडील मंडळी दोघांवरही पाळत ठेऊन होती. मंगळवारी हे दोघे बोलताना दिसताच त्यांना मारहाण करण्यात आली. सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

 

नांदुरा येथील बसस्थानकावर एका प्रेमी युगलाला मारहाण करण्यात आल्याची बाब आपल्या कानावर आली. याबाबत पोलिसात तक्रार दाखल नाही. त्यामुळे  याप्रकरणी कोणतीही  पोलिस कारवाई करण्यात आलेली नाही.

-सारंग नवलकार, पोलिस निरिक्षक, नांदुरा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूराCrime Newsगुन्हेगारी