संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील आदिवासीबहुल दयालनगर येथील एका घराला ५ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास आग लागून घरातील जीवनावश्यक साहित्य खाक झाल्याने संसार उघड्यावर आला. या घटनेत १ लाख २0 हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दयालनगर या आदिवासी गावातील देवसिंह नाथुसिंह कनाशा यांचे शिवणी शिवारा तील शेतातील घराला ५ मे रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत घरात साठवून ठेवलेले १५ पोते मका, २0 पोते गहू , १0 हजारांची रोकड, कपडे, भांडी असे जीवनावश्यक साहित्य घरासह जळून खाक झाले. यामध्ये एकूण १ लाख २0 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी कनाशा कुटुंबातील वृद्धा मळीबाई ही घराबाहेर झोपलेली होती, तर इतर कुटुंबीय ना तेवाइकाच्या लग्नाला गेले होते.
घराला आग लागून लाखोंचे नुकसान
By admin | Updated: May 7, 2015 01:11 IST