डोणगाव (जि. बुलडाणा), दि. २- शासकीय धान्य गोदामातून मालाची अफरातफर होणे, धान्य गोदामातून रेशनचा माल कमी मिळणे, वजन कमी भरणे आदी प्रकारामुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी स्थानिक शासकीय गोदामात सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मेहकर तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनात गोदामपालक श्रीकांत लहाने यांनी शासकीय गोदामात कॅमेरे बसवून एकप्रकारे शासकीय धान्य गोदामावर तिसर्या डोळ्याचे लक्ष वाढविले आहे.डोणगाव येथे आरेगाव रोडवर शासनाचे शासकीय धान्य गोदाम असून येथून परिसरातील स्वस्त धान्य दुकानात रेशनचा माल वाटप केल्या जातो; परंतु वारंवार माल कमी येणे, वजन कमी भरणे, अशा तक्रारी टाळण्यासाठी व धान्य मालाची काळजी घेण्यासाठी गोदामपालक यांनी शासनाच्या सहकार्याने शासकीय गोदामात सीसी कॅमेरे बसवून घेतल्याने आता चोवीस तास धान्य गोदाम सीसी कॅ मेर्यांच्या नजरेत राहणार असून, प्रत्येकाला मालाचे वितरणही व्यवस्थित होणार आहे.
डोणगाव येथील शासकीय धान्य गोदामावर सीसी कॅमे-यांची नजर
By admin | Updated: April 3, 2017 03:15 IST