शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोणार : दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू; दोघे गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:13 IST

लोणार: शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवलेला असून, नवीन रस्त्यासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. लोणार ते मंठा सुरू असलेल्या मार्गावर आठवड्याभरात २२ जानेवारी रोजी तिसरा अपघात घडला  असून, यामध्ये एका २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देलोणार ते मंठा मार्गावर घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवलेला असून, नवीन रस्त्यासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. लोणार ते मंठा सुरू असलेल्या मार्गावर आठवड्याभरात २२ जानेवारी रोजी तिसरा अपघात घडला  असून, यामध्ये एका २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.सचिन अशोक सोनवणे (वय २४ वर्ष), ओमकार महादेव खुळे  (वय २४ वर्ष), अतुल सदावर्ते (वय २२ वर्ष)  सर्व राहणार तळणी, ता. मंठा जि. जालना हे दुचाकीने अंदाजे ४ वाजून ३0 मिनिटांनी लोणारहून तळणीकडे जात असताना रस्त्यावरील खड्डय़ात दुचाकी जाऊ नये या प्रयत्नात उभ्या असलेल्या टाटा एस क्र. एम.एच. १६.एवाय.२२५८ या चारचाकी वाहनांवर धडकले.अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. लोणार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना मेहकर येथे हलविण्यात आले. मेहकर येथे उपचारादरम्यान  सचिन अशोक सोनवणे (वय २४ वर्ष) या युवकाचा मृत्यू झाला असून, वृत्त लिहेपर्यंत लोणार पोलीस स्टेशनला अपघातासंदर्भात नोंद झालेली नाही; मात्र अपघातग्रस्त दुचाकी व चारचाकी वाहन पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे.

ऑटो-दुचाकी अपघातात एक ठारदेऊळगावराजा: मालवाहू ऑटो व दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री सिंदखेडराजा मार्गावरील जांभोरा फाट्यानजीक घडली. जांभोरा फाट्यानजीक मालवाहू ऑटो व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात घडला. सदर अपघातात संजय भानुदास आढाव (वय ४५) रा. देवखेड, ता. सिंदखेडराजा हे जागीच ठार झाले. मृतकाचे चुलतभाऊ संजय नायबराव आढाव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऑटो चालका विरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव राऊत तपास करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlonar sarovarलोणार सरोवर