शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लोणारच्या ‘इजेक्टा ब्लँकेट’चे जतन होणार; शेतकऱ्यांना नोटीस देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 8:58 AM

जमीन मोजणीची तयारी भूमिअभिलेख विभागाने केली आहे.

नीलेश जोशी/रहेमान नवरंगाबादीबुलडाणा/लोणार : लोणार सरोवर परिसरातील इजेक्टा ब्लँकेटच्या जतनासाठी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वन्यजीव विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार लोणार सरोवराच्या दक्षिणेकडील भागातील मंठा रोडपासून पश्चिमेच्या असलेल्या भागातील जवळपास ८६ हेक्टर खासगी जमीन अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

जमीन मोजणीची तयारी भूमिअभिलेख विभागाने केली आहे. अलीकडील निरीक्षणानुसार संबंधित भागात इजेक्टा ब्लँकेट सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. लोणार सरोवर निर्मितीदरम्यान उल्केचा आघात होऊन उडालेला मलबा (इजेक्टा ब्लँकेट) अद्यापही काही भागात सुरक्षित आहे. या इजेक्टा ब्लँकेटची लांबी, रुंदी व अनुषंगिक माहिती संकलित करून त्याचे जतन करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने २०१९ मध्ये दिले होते. 

शेतकऱ्यांना नोटीस देणार

जमीन अधिग्रहित करण्यासाठी पुन्हा सर्व शेतकऱ्यांना नोटीस देणार आहे. काहींपर्यंत त्या पोहोचल्या नसल्याने मोजणी स्थगित झाल्याची माहिती तालुका भूमिअभिलेख अधिकारी चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवर