शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

धारातिर्थाच्या गोमुखातील धार आटण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:13 IST

लोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिकदृ्ष्ट्या महत्त्वाच्या धारातिर्थावरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे.

लोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिकदृ्ष्ट्या महत्त्वाच्या धारातिर्थावरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे. १९७२ च्या दुष्काळात लोणार शहराची तहान या एकमेव धारा तिर्थाने भागवली होती.परिणाणी यंदाचा दुष्काळ किती तीव्र आहे याची कल्पना यावी मागील सतत तीन ते चार वषार्पासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे लोणार सरोवर परिसरातील झरेही आता आटले आहेत. त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठीही भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेस नागपूर खंडपीठाने सुचीत केले आहे. मुळात या भागात आजा भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्याचे परिणाम दृश्य स्वरुपात दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम कधी काळी अखंडपणे वाहत असलेल्या या धारेवरही झाला आहे. धारातिर्थावरील गोमुखात पडणारी धार ही १९७२ च्या दुष्काळात आटली होती. त्यानंतर पुन्हा आता तशी स्थिती उद्भवत आहे. परिसरातील भूजल पातळीही घटल्याने सरोवर परिसरातील हिरवळी आता दृष्टीपथास येत नाही.दरम्यान, याचा फटका पर्यटनालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. धारातिर्थाबरोबरच लिंबी बारवेतही पाणी नाही.दुसरीकडे लोणार शहरास पाणीपुरवठा करणाºया बोरखेडी प्रकल्पातही आता ठणठणात दिसून येत आहे. लोणार शहराला एक महिन्या आड आज पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अशा स्थितीत या धारेचा होणार लाभ कितपत होईल, याबाबत शंकाच आहे.चार वर्षापूर्वी गोमुखात पाणी कोठून येते याचा पुरात्व विभागाच्या एका पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आतील बाजूने जमिनीखालून एका दगडी दांडाद्वारे सुबक पद्धतीने गोमुखापर्यंत पाणी आणल्या गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे गोमुखात येणाºया पाण्याचा स्त्रोतच आता आटला की काय अशी भिती व्यक्त होतेय. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणारlonar sarovarलोणार सरोवर