शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लोणार: धारतीर्थावरील संरक्षण भिंतीला तडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:52 AM

Lonar Crater News तडे गेलेली भिंत अचानक कोसळल्यास भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. 

- उमेश कुटेलोकमत न्यूज नेटवर्कलोणार : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवर काठावर धारतीर्थ आहे. येथे सतत पडणारी पाण्याची धार हे पर्यटकांचे खास आकर्षण असून येथून सरोवराचा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी पर्यटक येतात. जेथून सरोवराचा देखावा पाहतात, तेथील सरंक्षण भिंतीला जागोजागी तडे गेले आहेत. या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. तडे गेलेली भिंत अचानक कोसळल्यास भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. लाखो रुपये खर्च करून पर्यटकांच्या संरक्षण करण्याच्या दृष्टीने धारतीर्थावर संरक्षण भिंत पुरातत्त्व विभागाच्या वतीने बांधण्यात आलेली आहे. परंतु या भिंतीला जागोजागी मोठमोठे तडे गेल्याने भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पर्यटकांची वर्दळ पाहता याच सरंक्षण भिंतीजवळ उभे राहून सरोवराच्या निसर्गरम्य देखाव्याचा आनंद लुटतात व येथून फोटोही टिपतात. पण अशातच ही तडे गेलेली भिंत कोसळून अपघाताची घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सरोवर विकासासाठी १०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तर दुसरीकडे मात्र संबंधित विभागाकडून अशी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असतील तर या निधीचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा असतानाही या तडे गेलेल्या भिंतीची दुरुस्ती केली गेली नाही. यासाठी जागोजागी मोठमोठे तडे गेलेल्या भिंतीची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी पण निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित विभागाची चौकशीही करावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पर्यटन संकुलनावर १०७ कोटी रुपायाची सरोवर विकास निधीची घोषणा केली. धारतीर्थावरील तडे गेलेल्या सरंक्षण भिंतीची दूरुस्ती करण्यासाठी फंड मिळावा, यासाठी प्रस्ताव विचारधीन आहे. -हेमंत हुंकरे, पुरातत्व अधिकारी, लोणार.

टॅग्स :buldhanaबुलडाणाlonar sarovarलोणार सरोवर