शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लोणार सरोवरातील झऱ्यांतील पाण्याचा मिळणार डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:30 PM

लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जागतिक आश्चर्य असलेल्या खाºया पाण्याच्या लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी खास प्रकारचे ‘व्ही नॉच’ उपकरण या झºयांवर लावण्यात येणार आहे.वन्यजीव विभागाकडून प्रामुख्याने ते लोणार सरोवरातील रामगया या झºयासह असलेल्या अन्य झºयांवर ते बसविण्यात येणार आहेत. लोणार सरोवर संवर्धनासंदर्भात नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेच्या संदर्भाने उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशानुसार सरोवरातील झºयांवर हे ‘व्ही नॉच’ उपकरण बसविण्यात येणार आहे. प्रामुख्याने लोणार सरोवर व परिसरातील पाण्याचे रासायनिक पृथ:करण करण्याच्यादृष्टीकोणातून झालेली ही मोजदात उपयुक्त ठरणार आहे. या ‘व्ही नॉच’ उपकरणामुळे झºयांमधील पाणी प्रती मिनीट, प्रती तास किती पाणी खाºया पाण्याच्या या लोणार सरोवरात जाते याचे आकडे लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी गोळाकरणे गरजेचे झाले आहे. त्यातच सरोवर परिसरातील हे छोटे मोठे झरे अलिकडील काळात कमी झालेल्या पावसामुळे आटण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचाही या निमित्ताने अभ्यास करणे सोपे जाणार असल्याचे भूजल सर्व्हेक्षण विभागीतील सुत्रांनी स्पष्ट केले. गायमूख झरा, सीतान्हानी येथील झरा यासह शाडो टेंम्पलनजीक असलेला झरा अलिकडील काळात उन्हाळ््यात आटण्याचे प्रमाण वाढले आहे. रासायनिक पृथ:करण करण्यासाठी प्रत्यक्षात सरोवरात जाणाºया गोड्या पाण्याच्या परिणामांचाही अभ्यास करणे शक्य होणार आहे.वन विभागाद्वारे हे ‘व्ही नॉच’ उपकरणे लावण्यात येणार असून त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभाग त्यांना सहकार्य करणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य असल्यामुळे लोणार सरोवरातील ही उपकरणे जीएसडीए थेट न लावता वन विभागाला त्यासाठी सहकार्य करणार आहे. (प्रतिनिधी)

भूजल सर्व्हेक्षण विभाग सहकार्य करणार सरोवर परिसरातील या झºयांवर ही उपकरणे वनविभाग बसविणार आहे. त्यासाठी भूजल सर्व्हेक्षण विभाग अर्थात जीएसडीए संपूर्ण सहकार्य करणार आहे. पाण्याची मोजदाद करण्यासाठी या उपकरणार विशिष्ट प्रकारची मार्किंगही राहणार आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरLonarलोणारbuldhanaबुलडाणा