शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा विक्रीचे केंद्र बनतेय लोणार, पोलिसांपुढे मोठे आव्हान

By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 2, 2022 18:28 IST

दोन मोठ्या कारवाया, परंतू बाहेरच्या पोलीसांकडून

बुलडाणा : जिल्ह्यात लोणार शहर हे अवैध धंद्याचे तसेच गुटखा विक्रीचे केंद्र बनत आहे. याठिकानी तीन महिन्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफिया विरुद्ध दोन मोठ्या कारवाया बाहेरील पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. परंतु ह्याच कारवाया लोणार पोलिसांना का करता आल्या नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लोणार येथे अवैध धंदे तसेच गुटखा विक्री जोमात सुरु आहे. काही महिन्यापूर्वी स्थानिक गुटखा माफियांविरुद्ध मराठवाड्यातील शेलु मानवत पोलिसांनी २१ जून च्या रात्री दरम्यान मोठी कारवाई केली होती. यामध्ये शेलु पोलिसांनी एका शेतातील गोठ्यावर टाकलेल्या छाप्यात जवळपास १९ लक्ष ७७ हजार ६०० रुपये गुटखा घटनास्थळा वरुण ताब्यात घेतला होता. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर ही लोणार शहरात आणि तालुक्यात अवैध गुटखा विक्रीचे मोठे नेटवर्क हे कार्यरतच राहिले. २१ जून २०२२ रोजी जिल्ह्याबाहेरील पोलिसांनी शहरात येवुन केलेल्या कारवाई नंतरही अवैध गुटखा विक्रीला लोणार पोलिस प्रशासनाने बळ दिल्यामुळे शहरात अद्यापही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच आहे. सहाय्यक जिल्हा पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांनी सुद्धा सापळा रचून मध्यप्रदेश मार्गे लोणारकडे गुटखा घेवून येणाऱ्या एका ट्रकला मेहकर शहरातील लोणार बायपासवर पकडले. यामधुन जवळपास २५ लक्ष रुपयांचा गुटखा ताब्यात घेवून गुटखा माफ़ियाविरुद्ध मोठी कारवाई केली. मात्र या दोन्ही कारवायामध्ये खरा गुटखा किंग पोलिसांच्या हाताला लागलाच नाही.

आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी सन समोर आहे. शहरात चोरी छुप्या पद्धतीने सुरु असलेले अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात बिट अंमलदारांना सर्व सूचना केल्या आहे.- प्रदीप ठाकुर, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन लोणार.

काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

लोणार शहरातील अवैध धंद्याना पोलिस प्रशासनाची मूक संमती असून पोलिस विभागच्या आशीर्वादाने तालुक्यात २ क्लब, २६ चकले, ६ वर्लीचे अड्डे, प्रतिबंधित गुटखा विक्री, दारू विक्री यासह अनेक अवैध धंदे सुरु आहे. सात दिवसाच्या आता लोणार तालुक्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन जिल्ह्या पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालया समोर करण्यात येणार आहे.- राजेश मापारी, तालुकाध्यक्ष, काँग्रेस. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस