शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

लोणार : दोन कोटी रुपयांच्या खर्चात अनियमितता; तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमधील प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:36 IST

लोणार: राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने लोणार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण करून संबंधित गावातील ग्राम निधी, पाणीपुरवठा निधी व इतर योजनांच्या कामात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढला असून, ही रक्कम जवळपास २ कोटी ९७ लाख रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती समोर आली   आहे.

ठळक मुद्देखास अहवाल जिल्हा परिषदेला सादर

किशोर मापारी। लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने लोणार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण करून संबंधित गावातील ग्राम निधी, पाणीपुरवठा निधी व इतर योजनांच्या कामात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढला असून, ही रक्कम जवळपास २ कोटी ९७ लाख रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती समोर आली   आहे.दरम्यान, या प्रकरणी खास अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ष्णमुखराजन एस यांच्याकडे पाठविण्यात आला असून, प्रकरणी संबंधित सरपंच व कर्मचारी यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासन कोणत्या प्रकारची जबाबदारी निश्‍चित करते, याकडे सध्या लक्ष लागून आहे. २0१३-१४ आणि २0१४-१५ या दोन वर्षाचे हे लेखा परीक्षण असून, तसा अहवालही बनविण्यात आला आहे. संबंधित कालावधीमध्ये १ कोटी ९६ लाख ९४ हजार ८0२ रुपयांची आर्थिक नियमितता समोर आली आहे. त्याबाबत संबंधित सरपंच व सचिवांवर प्रसंगी जबाबदारी निश्‍चित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे. बुलडाणा येथील स्थानिक निधी लेखा परीक्षक विभागाचे सहायक संचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या एका पथकाने ही पाहणी करून हा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये संबंधित २२ ग्रामंपचायतींमध्ये काही गैप्रकार झाले असल्याचे समोर आले आहे. २0१३-१४ आणि २0१४-१५ या दोन आर्थिक वर्षादरम्यान कार्यरत असलेले सरपंच आणि सचिव यांच्या कार्यकाळात  विविध विकास कामात या अनियमितता आढळून आल्याची माहिती आहे.दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणामध्ये नेमक्या कोणावर जबाबदारी निश्‍चित करते याकडे सध्या तालुक्यातील राजकीय     वतरुळाचे लक्ष लागून आहे.                जिल्हा परिषद प्रशासनास गोपनीय स्तरावर हा अहवाल पाठविण्यात आला आहे.

अशी झाली अनियमितताअंगणवाडी मुलांना गणवेश पुरविण्यासाठी नियमबाहय़ खर्च, सौर दिव्यांची जादा दराने खरेदी, प्रमाणकाशिवाय रोख पुस्तकात नियमबाह्यरीत्या खर्च नोंदविणे, दलित वस्ती निधीचा अपहार, सिमेंट काँक्रिट बांधकामात अनियमितता, रोख पुस्तकात वसुलीच्या रकमा कमी अथा जमाच नसणे, १३ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून झालेल्या बांधकाम खर्चात अनियमितता, दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामात अनियमितता, मूल्यांकनाची बेरीज वाढवून ग्रामपंचायतींचे नुकसान करणे, सिमेंट काँक्रिट बांधकामाचे जादा दर लावून मूल्यांकन करणे, दिवाबत्ती साहित्य खरेदी करण्यात आले; परंतु ते लावण्याची मंजुरी नसताना खर्च नोंदविणे यासह अनेक बाबींवर केलेला खर्च हा निकषामध्ये बसत नसल्याचे या परीक्षणात दिसून आले. प्रकरणी अनुषंगिक कार्यवाही करण्यासाठी हा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याचे स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

या गावांमध्ये झाली अनियमिततागुंधा ( २,१0,१४८ रुपये), पिंपळनेर ( ३६,६0३), वेणी (३७,५0५), हत्ता (१,३८, ७१६), सरस्वती  (२९,२२७), चिखला (२९,५५,६२७), टिटवी (१,0४,८0४), मांडवा ४,५१,७0४९, वझर आघाव  (७,0३, ६७६), गोत्रा (१,९0,३0५), बीबी (४१,४७,७२६), सुलतानपूर (११,७९,३८१), मोहोतखेड (१,९१,३६८), गुंजखेड (४१,६९६), चोर पांग्रा (३,७९,७६७), पार्डी सिरसाट (२,३३,१४0), पिंप्री खंदारे (८,१८,६५९), महारचिकना (१0,३८,८४६), शिवनी पिसा (९,५२,७८0), आरडव (९,५0,१६९), वडगाव तेजन (२९,६५५), गायखेड ( ८, 0७,९५५ रुपये) या प्रमाणे ही अनियमितता झाल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरWaterपाणी