शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोणार : एसटी महामंडळाचे पर्यटकांकडे दुर्लक्ष; पर्यटन व्यवसायावर परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:20 IST

लोणार : येथे येणार्‍या पर्यटकांकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असून,  आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर  परिणाम होत आहे. यासाठी लोणार येथे एसटी महामंडळाचे आगार सुरू करून  विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देआगार सुरू करण्याची मागणी!

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : येथे येणार्‍या पर्यटकांकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असून,  आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर  परिणाम होत आहे. यासाठी लोणार येथे एसटी महामंडळाचे आगार सुरू करून  विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी होत आहे.जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक  दृष्टिकोना तून अतिशय महत्त्वाचे असल्याने दररोज शेकडो पर्यटक भक्त , विद्यार्थी शहरात  येतात; परंतु लोणार येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार  नसल्याने लोणारकरिता मेहकर व इतर आगारातून बसफेर्‍या चालवून प्रवाशांची  तात्पुरती सोय करण्यात येते; परंतु शहरात येणार्‍या पर्यटकांना पाहिजे त्या प्रमाणात  राज्य परिवहन महामंडळाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना  अवाजवी खर्च मोजून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने पर्यटन  व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. अतिमहत्त्वाच्या बसफेर्‍या पूर्ववत व  नवीन बसफेर्‍या कायमस्वरूपी सुरू करण्याबाबत कारवाई न झाल्याने प्रवाशांच्या  हितासाठी ५ मार्च रोजी लोणार प्रवासी सेवा असोसिएशन अध्यक्ष शेख उस्मान  शेख दाउद साखळी उपोषणास बसणार आहेत.जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या व  आवश्यक असलेल्या फेर्‍या सुरु करण्यासाठी लोणार येथील प्रवासी सेवा  असोसिएशनच्यावतीने अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या. मागणीनुसार काही  बसफेर्‍या सुरु करण्यात आल्या. नव्याने सुरु करण्यात आलेल्या बस फेर्‍यांना  प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिल्याने राज्य परिवहन मंडळाच्या उत्पनातही वाढ झाली  होती; परंतु खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग   परिवहन महामंडळाने अनेक लांब पल्ल्याच्या व अत्यंत महत्त्वाच्या बसफेर्‍या  बंद केल्या असल्याचे लोणार येथील प्रवासी सेवा असोसिएशनने नमूद करीत  त्यासंदर्भात १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई ये थील महाव्यवस्थापक यांना अत्यंत महत्त्वाच्या व काही नवीन फेर्‍या सुरु  कराव्या, अशी मागणी केली आहे; परंतु अतिमहत्त्वाच्या बसफेर्‍या पूर्ववत व  नवीन बसफेर्‍या कायमस्वरूपी सुरु करण्याबाबत कारवाई न झाल्याने प्रवाशांच्या  हितासाठी ५ मार्च रोजी लोणार प्रवासी सेवा असोसिएशन अध्यक्ष शेख उस्मान  शेख दाउद यांनी साखळी उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा महाव्यवस्था पक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना दिला आहे.

टॅग्स :Lonarलोणारstate transportराज्य परीवहन महामंडळ