शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : ‘साथी हाथ बढाना’; प्रचारासाठी मित्र पक्ष मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 14:32 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरली आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस संयुक्तपणे जाहीरनामा बनवित आहे. लोकसभा मतदार संघांतर्गत येत असलेल्या सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये कॉर्नर सभा मतदारांशी थेट संवाद साधल्या जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेसची ताकद अधिक असल्याने त्याचा राष्ट्रवादीला फायदा होत आहे.जिल्ह्यात मतदार संघनिहाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून आघाडीचे प्रचार कार्यालय अनेक ठिकाणी उभारले आहे. परंतू या प्रचार कार्यालयांमध्ये काँग्रेस व इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते बोटावर मोजण्या इतकेच दिसून येत आहेत. मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचाराच्या रॅलीमध्ये दिसून येतात, मात्र त्यातील स्वयंस्फुर्तीने किती सहभागी होताहेत हे सांगणे अवघड आहे. काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद मधील सत्ताकरणांवरून अद्यापही खुमखुमी कायम आहे. प्रचार कार्यालयातून सध्या कार्यकर्त्यांना डोज देण्याचे काम जोमात सुरू आहे. कार्यकर्त्यांना बुथ निहाय जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रत्येक कार्यालयात दिवसातून एक बैठक घेण्यात येत आहे. उमेदवार येताच कार्यकर्त्यांची धावपळ प्रचार कार्यालयात दिसून येते. त्यानंतर प्रत्येक जण आपल्या बुथ परिसरातील कामांचा आढावा उमेदवारांसमोर मांडण्याची धडपड करतो. तर पुढील दिवसातील बैठकांचे नियोजनही मांडले जात आहे. या सर्व कामामध्ये मित्र पक्षातील काही मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गैरहजेरी मात्र शंका उपस्थित करते.

राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस एक पाऊल पुढेसर्व मित्र पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. काही ठिकाणी तर प्रचार कार्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रस पेक्षा काँग्रेसच एक पाऊल पुढे आहे. मनसेने सुद्धा आघाडीला साथ दिली आहे.- डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस

आघाडीचा धर्म पाळत जबाबदारी पूर्णराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी झालेली आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळत प्रचारामध्ये आमची जबाबदारी पूर्ण करत आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी एकजुटीने कामाला लागले आहेत. ज्याठिकाणी आमचे नेतेच देश पिंजून काढतात; तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचेही तेच कर्तृव्य आहे.- आमदार हर्षवर्धन सपकाळ, मित्रपक्ष काँग्रेस.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक