शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Lok Sabha Election 2019: कर्मचारी करतील ‘इडीसी’द्वारे थेट केंद्रावर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 6:11 PM

निवडणूक आयोगाने १६ व्या लोकसभा निवडणुकीपासून ‘इडीसी’ (इलेक्शन ड्युटी सिर्टफिकेट) पद्धत राबविण्यास प्रारंभ केला आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी जवळास १८ हजार कर्मचारी लागणारबुलडाणा: लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया निर्धाेक पारपाडण्यासाठी जिल्ह्यात सुमारे १८ हजार कर्मचारी जिल्ह्यात जवळपास व्यस्त आहेत. या वाढत्या व्यस्ततेमुळे प्रसंगी मतदान करण्याबाबत त्यांचात काहीसी अनास्था तथा बॅलेट पेपरसंदर्भातील तांत्रिक अचडणी पाहता या कर्मचार्यांचा मतदााचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने १६ व्या लोकसभा निवडणुकीपासून ‘इडीसी’ (इलेक्शन ड्युटी सिर्टफिकेट) पद्धत राबविण्यास प्रारंभ केला आहे. १७ व्या लोकसभेतही त्याची अंमलबजावणी होत असून मतदानाचा टक्का वाढविण्यास त्यामुळे मदत होणार आहे.गेल्या काही काळापासून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होत आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने स्वीप-१, स्वीप-२ सारखे उपक्रम राबवले होते. यासोबतच सर्वस्तरावर हा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इडीसी पद्धतीकडे पाहले जाते. आयोगानेही ही बाब गांभिर्याने घेत नागरिकांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासोबतच निवडणूक कामात व्यस्त कर्मचार्यांचाही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न चालवले आहेत, असे सुत्रांनी सांगितले.पूर्वी पोस्टल बॅलेट जवानांसोबतच सामान्य कर्मचारी, निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी यांच्यासाठी होते. यंदा जवानांसाठी ईटीबीएस अर्थात इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटर पोल्सट बॅलेट ही पद्धत १७ व्या लोकसभेमध्ये लागू करण्यात आलेली आहे. तर १६ व्या लोकसभेत आणलेली इडीसी पद्धत यंदाही कायम आहे. यात लोकसभा मतदारसंघातंर्गत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांसाठी ही पद्धत अवलंबवील्या जाणार आहे. यात निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, मतदान केंद्रावरील कर्मचारी, झोनल आॅफिसर, वाहन चालक, होमगार्ड, पोलिस, फोटोग्राफरसुद्धा या इडिसी पद्धतीने मतदान करू शकतील.त्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणूक कर्तव्यावर असल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि यादी भाग क्रमांक तथा एक छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवून इडीसी प्रमाणपत्र घ्यावे व ज्या ठिकाणी त्यांना कर्तव्यावर देण्यात आलेले आहे तेथील मतदान केंद्रावर ओळख पटवणारी कागदपत्रे सोबतच इडीसी प्रमाणपत्र  दाखविल्यास त्या ठिकाणी त्यांना मतदान करता येईल.दरम्यान, जिल्ह्यात जवळपास यंदा १८ हजारांच्या आसपास कर्मचारी निवडणूक कामामध्ये येत्या काळात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. त्यांनाया इडीसी पद्धतीचा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रशासनानेही त्यावर  गांभिर्याने पावले उचलणे आवश्यक आहे.

अशी आहे पद्धतबुलडाणा शहरातील कर्मचारी खामगावमध्ये कर्तव्यावर आहे पण त्याची देऊळगाव राजा तालुक्यातील गावात निवडणुकीच्या कामासाठी ड्युटी लागली. अशा स्थितीत त्याने देऊळगाव राजा तालुक्यातील कुठल्याही मतदान केंद्रावर जावून निवडणूक कामासाठी झालेल्या नियुक्तीचा आदेश व ओळख पटविणारे छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवल्यास त्याला तेथे मतदान करता येईल. तेथे त्याची मतदान केद्र अधिकारी नोंद घेऊन संबंधित कर्मचार्याच्या नावासमोर इडीसी नोंद करेल तर या कर्मचार्याच्या गावातील मतदान केंद्रावरील अधिकारीही  त्याच्या नावासमोर इडीसी लिहीणार असल्याने त्याच्या नावावर दुसरा कोणीही मतदान करू शकणार नाही.

हे करू शकतील मतदाननिवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले शासकीय कर्मचारी अशा पद्धतीने मतदान करू शकतील. मात्र निवडणुकीच्या कामासाठी असलेले खासगी छायाचित्रकार, वाहन चालक, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांच्या बाबतही अनुषंगीक विषयान्वये स्पष्टता होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक