शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : ‘वंचित’ समोर नियोजनाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:11 IST

सध्याच्या निवडणुकीत मात्र वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले बळीराम सिरस्कार यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एक अपवाद वगळता १९८० ते २००९ पर्यंत जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती; या उमेदवारांच्या यशामध्ये सर्वांना सोबत घेण्याची वृत्ती, स्थानिक प्रश्नांचा वेध घेण्याची क्षमता व सर्वात महत्वाचे म्हणजे नियोजन कौशल्य यांचा मोठा वाटा राहिल्याने हे उमेदवार कधी बाहेरचे वाटलेच नाही. या कसोटीवर सध्याच्या निवडणुकीत मात्र वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले बळीराम सिरस्कार यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून त्यांच्या नियोजनाचा गोंधळ उडाला असून अखेर त्यांना दूसरा निवडणूक अर्ज दाखल करण्याची धावपळ येनवेळी करावी लागल्याने या गोंधळावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्यांना नियोजनाच्या पातळीवरच सर्वाधीक वेळ देण्याचे आव्हान आहे.बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे व भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव या दोन हेवीवेट नेत्यांमध्ये लढत होत आहे. लढतीमध्ये वंचितच्या वतिने बळीराम सिरस्कार यांनी एन्ट्री केल्याने ही लढत तिरंगी होईल अशी चर्चा अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र चर्चा सिरस्कारांच्या कोलमडलेल्या नियोजनाचीच आहे. २२ मार्च रोजी आ.सिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी कमालीचा सावळा गोंधळ दिसून आला होता. सकाळी ११ वाजेपासून पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा कचेरी परिसरात त्यांची प्रतीक्षा करीत असताना ते अंतिम क्षणी म्हणजे पावणे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. उमेदवारांसह पाच पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश असल्याने व त्यांचेही कोणतेच नियोजन नसल्याने जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे, भारिप नेते नगरसेवक मो.सज्जाद हे बाहेरच अडकले. हा गोंधळ एवढयावर न थांबता अर्ज सादर केल्यावरही कायम राहिला. त्यांनी अर्जात दिलेल्या १० पैकी २ सूचकांची नावे मतदार यादीतच नसल्याचे आढळून आले. यामुळे पुन्हा नव्याने कोरा अर्ज घेऊन अखेरच्या दिवशी भरला. नामांकन प्रक्रियेतच उडालेल्या या गोंधळाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली.मुळातच सिरस्कार हे जिल्ह्याबाहेरील उमेदवार असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांवरच त्यांची मदार राहणार आहे. गेल्यावेळचे राष्टÑवादीचे उमेदवार असलेले कृष्णराव इंगळे यांना मिळालेल्या मतांचे गणित डोळयासमोर ठेवून वंचित बहूजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली असली तरी कृष्णरावांचे ‘स्थानिक ’ नेतृत्व दूर्लक्षीत करता येणार नाही. नेमक्या याच मुद्यावर सिरस्कार बॅकफुटवर आल्याने पदाधिकाऱ्यांचाही गोंधळ उडाला आहे. त्यातच बुलडाणा मतदारसंघाचा विस्तार अफाट असल्याने त्यांची प्रचार करताना व प्रचाराचे नियोजन करताना चांगलीच दमछाक होत आहे. दूसरीकडे वंचित आघाडीकडे अनेक सक्षम पर्याय असताना आयात उमेदवाराला मिळालेल्या संधी मुळे स्थानिक नेत्यांमध्ये असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. ‘वंचित’ चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी पदाधिकारी सोबत दिसत असले तरी नेत्यांचे रुसवे फुगवे काढण्यातच त्यांचा सर्वाधीक वेळ जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नियोजनाची बाजु सक्षमपणे सांभाळत त्यांना दूरंगी लढतीला तिरंगी लढतीत परावर्तीत करण्याचे कौशल्य दाखवावे लागेल एवढे मात्र निश्चीत!

टॅग्स :buldhanaबुलडाणाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBaliram Siraskarबळीराम सिरस्कारbuldhana-pcबुलढाणा