शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

Lok Sabha Election 2019: बुलडाण्यात दुपारपर्यंत ३४.४३ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:35 IST

१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा लोकसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.

ठळक मुद्दे १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा लोकसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. मतदान यंत्रामध्ये निर्माण झालेल्या किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे तब्बल २६ ठिकाणी बॅलेट युनीट तर २४ ठिकाणी कंट्रेल युनीट बदलावे लागले.५६ ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलावे लागण्याची पाळी निवडणूक यंत्रणेवर आली.

बुलडाणा - १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा लोकसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान, मतदान यंत्रामध्ये निर्माण झालेल्या किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे तब्बल २६ ठिकाणी बॅलेट युनीट तर २४ ठिकाणी कंट्रेल युनीट बदलावे लागले. ५६ ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलावे लागण्याची पाळी निवडणूक यंत्रणेवर आली.

बुलडाणा जिल्ह्यातील १९७९ मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोल झाल्यानंतर शांततेत मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी सात ते नऊ या कालावधीत ७.८५ टक्के अर्थात आठ टक्के मतदान झाले होते. नऊ वाजेपर्यंत एकूण एक लाख ३८ हजार १५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची ही सरासरी टक्केवारी २०.२९ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यामुळे प्रामुख्याने या टप्पात जवळपास १२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

दुसरीकडे दुपारी एक वाजेदरम्यान मतदानाच्या दिवशी तिसऱ्या टप्प्यात ३४.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये  सहा लाख पाच हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये दोन लाख ६८ हजार ९४० महिला आणि तीन लाख ३६ हजार ५५८  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुलडाणा जिल्ह्यात १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार आहेत. यामध्ये आठ मतदार हे तृतियपंथीय आहे.

बुलडाणा लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असून बुलडाणा लोकसभा मतदार संघात  बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभांचा समावेश आहे. सकाळी मतदान केंद्रांवर तुलनेने कमी रांगा होत्या. ९ ते ११ दरम्यान त्यात वाढ झाली. सोबतच ११ ते एक दरम्यानही मतदान केंद्रावर गर्दी वाढल्याने जिल्ह्याचे सरासरी मतदान हे एक वाजेपर्यंत ३४.४२ टक्क्यांवर पोहोचले होते.

तीन टक्के यंत्रे बदलावली लागली

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच तीन टक्के व्हीव्हीपॅट यंत्रे मॉकपोल दरम्यान बदलावी लागील आहेत. दरम्यान, १.२१ टक्के कंट्रोल युनीट तर १.३१ टक्के बॅलेट युनीट बदलावे लागले आहे. आकड्या सांगायचे झाल्यास २६ बॅलेट युनीट, २४ कंट्रोल युनीट आणि ५६ व्हीव्हीपॅट मशीन बदलावल्या लागल्या आहेत. जिल्ह्यात ३६९ बॅलेट युनीट, ३६३ कंट्रोल युनीट आणि ४६६ बॅलेट युनीट राखीव ठेवण्यात आलेले असल्याने ही यंत्रे बदलण्यात फारशी अडचण गेली नाही.

अधिकारी नियंत्रण कक्षात ठाण मांडून

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व संबंधीत वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसून मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणा