शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : बुलडाणा जिल्ह्यात दहा दिवस राहणार कठोर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:01 IST

Lockdown in Buldhana : जिल्ह्यात १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून २० मे च्या सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधानंतरही जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून, रुग्ण दुपटीचाही वेग ३५ दिवसांवर आला आहे. कोराेनाची साखळी तुटण्याऐवजी रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यात १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून २० मे च्या सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेची परवानगी असणार आहे. सोबत कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय तथा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

घरपोहोच सेवा, ग्राहकांसाठी दुकाने बंद  सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, मिठाई, बेकरी, पिठाची गिरणी यासह खाद्य पदार्थांची दुकाने बंद राहणार आहेत.

 पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांशी निगडित दुकाने, गॅस एजन्सी बंद राहील. मात्र, घरपोहोच सिलिंडरचे वाटप सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत करता येईल.

या प्रतिष्ठानांना राहणार सवलत  खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन, औषध सेवा २४ तास सुरू राहील.  अत्यावशक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये, एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांना परवानगी राहील. शासकीय यंत्रणेमार्फत मान्सूनपू‌र्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयक कामे चालू राहतील. या काळात विविध यंत्रणांना वेगवेगळ्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही.

  घरपोहोच सेवा पुरविणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक, तसेच संबंधित दुकानाचे अेाळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे.जिल्ह्यात १० मे च्या रात्री ८ वाजल्यापासून २० मे च्या पहाटे ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. दहा दिवसांच्या कडक निर्बंधांच्या  कालावधीत वैद्यकीय सेवा, मेडिकल, दवाखाने  व दुधाचे वितरण वगळता इतर दुकाने व आस्थापना, शासकीय कार्यालये सुरू राहणार नाहीत. वृत्तपत्राचे वितरण सुरू राहणार आहे.- एस. रामामूर्ती, जिल्हाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस