बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांसाठी लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:07 PM2020-07-06T18:07:49+5:302020-07-06T18:08:16+5:30

जिल्ह्यात सात ते २१ जुलै दरम्यान १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Lockdown in Buldana district for 15 days | बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांसाठी लॉकडाऊन

बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांसाठी लॉकडाऊन

Next

बुलडाणा: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बुलडाणा जिल्ह्यात सात ते २१ जुलै दरम्यान १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, जुलै अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही ७०० च्या घरात जाण्याची शक्यता पाहता १५ दिवसांच्या या लॉकडाऊनची अधिक गंभीरतेने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहा जुलै रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली. यावेळी आ. राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. हा लॉकडाऊन अत्यंत कडक राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा पुर्णतहा बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे सध्या मलकापूर, मोताळा आणि नांदुरा येथे लॉकडाऊन सुरू असून तो १५ जुलै रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर या तिनही ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन या तीनही तालुक्यांना लागू राहणार आहे. नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून दुचाकीवरही एकाच व्यक्तीला सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याची मुभा राहणार आहे.  दुपारी तीन ते दुसºया दिवशी सकाळी नऊ पर्यंत कडक लॉकडाऊन अर्थात कर्फ्यु जिल्ह्यात राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न करणाºयांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली आहे. चार चाकी वाहनांसाठी प्रवासादरम्यान निम्मेच व्यक्ती वाहनात राहतील याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांना कुठलीही दयामाया दाखवली जाणार नाही. ‘ब्रेक द चेन’ हे टार्गेट समोर ठेवून हे लॉकडाऊन अत्यंत गंभीरतेने राबविण्यात येणार आहे. मलकापूरमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम समोर आले असून त्याच पद्धतीने जिल्ह्यातही हा लॉकडाऊन सुरू राहणार आहे. आंतरजिल्हास्तरावर बस वाहतूक सध्या सुरू आहे. हा राज्यस्तरावरील निर्णय आहे. त्यामुळे या बसेस निर्धारित वेळेत सुरू राहण्याची शक्यता आहे.

शारीरिक अंतर ठेवण्यासाठी छत्र्यांचा वापर
सकाळी नऊ ते दुपारी तीन यावेळेत अत्यावश्यक वस्तू सेवांच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºया नागरिकांनी सोबत छत्री ठेवून दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर राखण्याचे आवाहन करत संसर्ग टाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

जुलै अखेर जिल्ह्यात ७०० रुग्ण
 कोरोना संसर्गाची जिल्ह्यात वाढती व्याप्ती पाहत जुलै अखेर पर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आकडा हा ७०० च्या घरात जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सज्ज झाली असून कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी पोलिस, जिल्हा परिषद, आरोग्य आणि महसूल विभागात समन्वयाने काम करण्यात येत आहे. संभाव्य आपत्कालीन स्थितीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

काय सुरू राहणार
दुध, भाजीपाला, किराणा दुकाने ही सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत सुरू राहणार आहेत. दुध तथा भाजीपाला विक्रेत्यांना पासेस देण्यात येणार आहेत. सोबतच वृत्तपत्र वाटपाचे कामही सुरू राहणार असून हॉकर्सना पासेसही दिल्या जाणार आहेत. प्रारंभी एकाद दिवस यात अडचण येवू शकते मात्र नंतर त्यात सुरळीतता येईल.

जिल्ह्याच्या सीमा सील करणार
अन्य ठिकाणाहून पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होणार नाही, यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चार चाकी वाहनात क्षमतेच्या निम्मेच लोक बसू शकतील. दुचाकीवर फक्त एकाच व्यक्तीला प्रवासाची मुभा राहील. तीन चाकी वाहनात चालक व एक प्रवासीच बसू शकतील. दुपारी तीन नंतर संपूर्ण जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू राहील. कायदा व सुव्यवस्थेच्या काळात ज्या प्रमाणे संचारबंदी लागू असते त्याच धर्तीवर ही संचारबंदी दुपारी तीन ते दुसºया दिवशी सकाळी नऊ पर्यंत सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Lockdown in Buldana district for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.