शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते विकासासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:01 IST

अकोला : राज्यातील १५०० किमि रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी शासनाने आशियाई विकास बँकेकडून ३५०० कोटी रुपये कर्ज घेण्याला मंजूरी दिली आहे.

अकोला : राज्यातील १५०० किमि रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी शासनाने आशियाई विकास बँकेकडून ३५०० कोटी रुपये कर्ज घेण्याला मंजूरी दिली आहे. या कर्जाची परतफेड २०४५-४६ पर्यंत दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यासोबतच रस्त्यांचा वापर करणाऱ्यांकडून पथकर वसुलीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात रस्त्यांचा वापर करणाऱ्या जनतेच्या खिशावर टोलवसुलीचाही भार पडणार आहे.रस्ते सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार येत्या तीन वर्षात १५०० किमिच्या रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील या कामांची एकुण किंमत ५००५ कोटी रुपये आहे. त्यापैकी ७० टक्के रक्कम आशियाई विकास बँकेच्या कर्जातून उपलब्ध केली जाणार आहे. तर ३० टक्के रक्कम म्हणजे, १५०५ कोटी रुपये शासनाचा सहभाग म्हणून दिली जाणार आहे. ही तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध होणाºया निधीतून करावी लागणार आहे. आशियाई विकास बँकेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम २०१९-२० पासून ते २०४५-४६ या आर्थिक वर्षापर्यंत परतफेड करण्याचेही ठरवण्यात आले आहे. त्यासाठी राज्याच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पात किमान २१८ कोटी ते १९१४ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. या रकमेसोबतच सुधारणा झालेल्या रस्त्यांवर वाहनधारकांकडून पथकर वसुली केली जाणार आहे. त्यातून प्राप्त होणारी रक्कमही बँकेच्या कर्जापोटी भरली जाईल. 

या मार्गांची होणार सुधारणाकर्ज घेऊन सुधारणेसाठी निवड केलेल्या रस्त्यांमध्ये प्रमुख राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या ९० हजार किमि रस्त्यांपैकी १८१८९ किमि रस्त्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी १५०० किमिचे रस्ते कर्जातून होणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्गbankबँक