बुलडाणा : भरधाव ट्रकने महिला पाेलीस कर्मचाऱ्यास चिरडल्याची घटना ६ सप्टेंबर राेजी सकाळी बुलडाणा चिखली मार्गावर सुंदरखेड परिसरात घडली. गीता बामंदे असे मृतक पाेलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एलसीबीमध्ये कार्यरत असलेल्या गीत बामंदे या चिखली राेडने ६ सप्टेबर राेजी सकाळी जात हाेत्या. यावेळी भरधाव ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पाेलिसांनी धाव घेउन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आराेपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू हाेती.
भरधाव ट्रकने महिला पाेलीस कर्मचाऱ्यास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 10:49 IST