शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होतेय बुलडाणा शहराचे सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:17 IST

बुलडाणा :  चतुर्थकरमुल्यांकन (आता पंचवार्षिक) खो देत शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीत कथितस्तरावर गैरप्रकार करणार्यांना आता चांगलाच चाप बसणार असून मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत बुलडाणा शहरातील मालमत्तांचे आता ३६0 डिग्रीमध्ये लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाह्य सर्व्हेक्षणास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा खुबीने वापर ३६0 डिग्रीमध्ये मालमत्तांचे बाहय़ सर्वेक्षणकर चुकवेगिरीला बसेल आळा

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  चतुर्थकरमुल्यांकन (आता पंचवार्षिक) खो देत शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीत कथितस्तरावर गैरप्रकार करणार्यांना आता चांगलाच चाप बसणार असून मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत बुलडाणा शहरातील मालमत्तांचे आता ३६0 डिग्रीमध्ये लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाह्य सर्व्हेक्षणास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या (महाआयटी) अंतर्गत हे  सर्व्हेक्षण करण्यात येत असून बुलडाणा शहरात आगामी २0 दिवस ते केले जाणार आहे. सोबतच जीएसआय मॅपींगचीही त्याला जोड मिळणार असल्याने मालमत्तांच्या कर चुकवेगिरीला त्यामुळे लगाम बसणार आहे. यामध्ये रस्त्यावरून चालणार्या चारचाकी वाहनामध्ये अत्याधुनिक यंत्राचा ३६0 डी कॅमेरा आणि स्कॅनिंगद्वारे मालमत्तांचे सर्व्हेक्षण     केले जात आहे. राज्यात काही     मनपा, पालिका आणि नगर पंचायतीमध्ये याची सुरूवात झाली आहे. त्यादृष्टीने  बुलडाणा हे दुसरे शहर ठरले आहे.

बुलडाण्यात १५ हजार मालमत्ताबुलडाणा शहरात जवळपास १५ हजार मालमत्ता असून गेल्या दहा वर्षात या मालमत्तांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र चतुर्थ कर मुल्यांकनाला वारंवार खो मिळत असल्याने प्रत्यक्षातील मालमत्ता किती याचा अंदाज येत नाही. त्यामुळे करचुकवेगीरी वाढली आहे. सोबतच बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत कमी करक आकारण्याचे प्रकार घडत आहेत. या तंत्रज्ञानातून तयार डिजीटल छायाचित्रांमुळे आता ही कर चुकवेगिरी करता येणार नाही.

शिर्डीतही झाले सर्वेक्षणनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे लायडार तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करून चार जणांची ही टिम सध्या बुलडाण्यात आली आहे. २0 दिवस हे सर्वेक्षण चालणार असून सुमारे १४ चौरस किमीचा विस्तार असलेल्या बुलडाणा शहरातील गल्ली बोळात जाऊनही दुसर्या टप्प्यात सर्व्हे होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणा