देऊळगावराजा (जि. बुलडाणा ) : मेंढय़ा चारण्यासाठी गेलेल्या कृष्णा गुलाबराव धाडे (१८ रा. टेंभुर्णी) या मेंढपाळ युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना जवळखेड शिवारात बुधवारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. देऊळगावराजा तालुक्यातील जवळखेड शिवारात मेंढय़ा चारत असताना बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी कृष्णा उतरला होता. बराच वेळ तो बाहेर न आल्यामुळे त्याचा आजोबांनी त्याचा शोध घेतला होता. दरम्यान, ही माहिती कळताच जवळखेड ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत बुडालेल्या कृष्णाचा मृतदेह बाहेर काढला. ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.