शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:13 IST

लोणार : दोन  दिवसापूर्वी शहरातील एका क्लिनीकमध्ये अल्पवयीन मुलीच्या  झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुलीची ६0 वर्षीय आई लताबाई पन्नाशा भोसले  आणि डॉ. सुभाष पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना २0 नोव्हेंबर रोजी अटक केली.

ठळक मुद्देमुलीचया आईसह डॉक्टरला अटकजिल्हा शल्यचिकित्सकांनी केली ‘साईकृपा क्लिनीक’ची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : दोन  दिवसापूर्वी शहरातील एका क्लिनीकमध्ये अल्पवयीन मुलीच्या  झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुलीची ६0 वर्षीय आई लताबाई पन्नाशा भोसले  आणि डॉ. सुभाष पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना २0 नोव्हेंबर रोजी  अटक केली. गर्भपातादरम्यान, या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचे जिल्हा  शल्यचिकित्सक यांनी लोणार येथील या क्लिनीकची पाहणी केली असता समोर  आले आहे.तालुक्यातील आरडव येथील अल्पवयीन मुलीचा डॉ. सुभाष पुरोहित यांच्या साई  िक्लनिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी  अंदाजे साडेसहाच्या  दरम्यान घडली होती. साई क्लिनिकमध्ये डॉ. सुभाष पुरोहित  या मुलीवर उपचार करीत असताना वडील पन्नाशा भोसले व लता भोसले मुलीच्या  सोबत होते. दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यामुळे त्यावेळी गोंधळ झाला होता.  पोलिसांना याची माहिती मिळताच त्यानुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता. मृत  मुलीचे १९ नोव्हेंबरला लोणार ग्रामीण रुग्णालयात १९ नोव्हेंबर रोजी डॉ. राजश्री  बनसोडे, डॉ. भटकळ व अन्य डॉक्टरांनी शवविच्छेदन केले होते. प्रकरणी आरडव येथील लता भोसले यांच्या तक्रारीवरून प्रारंभी लोणार पोलिस  ठाण्यात र्मग दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक  राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उकंडराव राठोड, राम गी ते, चंद्रशेखर मुरडकर करीत आहेत. प्रसारमाध्यमामध्ये यासंदर्भात वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी साई क्लिनिकची तपासणी केली असता  डॉ. सुभाष पुरोहित यांनी त्या १५ वर्षीय मुलीचा गर्भपात केल्याचे त्यांच्या तपासात  समोर आले. त्यामुळे याप्रकरणाताल वेगळे वळण लागले आहे.यासंदर्भात लोणार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन  मुलीची आई लताबाई पन्नाशा भोसले आणि साई क्लिनीकचे डॉ. सुभाष पुरोहीत  यांना पोलिसांनी २0 नोव्हेंबरा रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणात अल्पवयीन  मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तथा बाल लैंगिक अपराधापासून  संरक्षण अधिनियम २0१२ सह वैद्यकीय गर्भपात सुधारीत कायदा २00२ सह अन्य  कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिनिक सीलमहाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनल अँक्ट ३७ नुसार डॉ. सुभाष पुरोहीत यांच्यावर गुन्हा  दाखल करून त्यांचे क्लिनीक सील करण्यात आले आहे. लोणार वैद्यकीय  अधिकारी डॉ. संदीप भटकळ यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.- 

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरCrimeगुन्हा