शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेटाडोअरच्या धडकेत चिमुकली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 17:48 IST

पिंपळगाव राजा : भरधाव मेटाडोअरने दिलेल्या धडकेत दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली.

पिंपळगाव राजा : भरधाव मेटाडोअरने दिलेल्या धडकेत दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली.पिंपळगाव राजा येथे पेठपुरा भागात शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता मेटाडोअर क्रमांक एम.एच.०४ -६८९० या वाहनाने कृष्णाली अमोल तिवारी या दीड वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक दिली. यात तीच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. अशा अवस्थेत चिमुकलीला सर्वप्रथम खामगाव येथील सिल्व्हरसिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथे नेत असतना वाटेतच चिमुकलीचा अंत झाला. यानंतर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मुकुंद रमेश भगत रा.भालेगाव बाजार यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून वाहनचालक अब्दुल साजिद शेख मुराद (वय ३९ वर्षे) याच्या विरूध्द भादविच्या कलम २७९, ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार प्रशांत कावरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.(वार्ताहर)

 पित्याची ती भेट ठरली शेवटची!मृत्यू झालेल्या कृष्णाली या दीड वर्षीय चिमुकलीचे वडील अमोल तिवारी हे गावात काम नसल्याने रोजगाराच्या शोधात चेन्नई येथे गेले आहेत. जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजीच ते चेन्नई येथे रवाना झाले. अशात दुसºयाच दिवशी मुलीच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या कानावर पडली. यामुळे अमोल तिवारी यांना धक्काच बसला. अतिशय दुर्देवी या घटनेमुळे परिसरात दु:खद छाया पसरली आहे. वडीलांनी आपल्या चिमुकलीची ८ मार्चला घेतलेली भेट ही शेवटची भेट ठरली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात