शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

एनटीएस’साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी ‘प्रज्ञावान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 17:46 IST

बुलडाणा: प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस)साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी पात्र ठरल्याचे वास्तव राज्य परीक्षा परिषदेने १ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर केलेल्या निवड यादीने समोर आले आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस)साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी पात्र ठरल्याचे वास्तव राज्य परीक्षा परिषदेने १ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर केलेल्या निवड यादीने समोर आले आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) इयत्ता दहावीसाठी राज्यस्तर परीक्षेसाठी राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. त्यापैकी एनटीएस राष्ट्रीय परीक्षेसाठी राज्यातून अवघ्या ३८७ विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली आहे. शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाºया स्पर्धा परीक्षांमध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला विशेष महत्त्व दिल्या जाते. ही परीक्षा इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिष्यवृत्ती देणे हा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी ही परीक्षा दोन स्तरावर घेतली जाते. पहिले राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा आणि त्यानंतर राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत ४ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दहावीसाठी राज्यस्तर परीक्षेची निवड यादी व शाळानिहाय गुणयादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एनटीएस इयत्ता दहावी परीक्षेसाठी राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. त्यापैकी एनटीएस राष्ट्रीय परीक्षेसाठी राज्यातून ३८७ विद्यार्थी एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील १९६, ओबीसी संवर्गातील १०४, अनुसूचित जाती ५८, अनुसूचित जमाती २९ अशा एकूण ३८७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. संबंधीत संवर्गातील दिव्यांगासाठीचे चार टक्के आरक्षण देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड जात किंवा दिव्यांग आरक्षणातून झालेली आहे त्यांना सदर प्रमाणपत्र एनसीईआरटी नवी दिल्ली यांना सादर केल्याशिवाय त्यांची निवड ग्राह्य धरली जाणार नसल्याचे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.  राष्ट्रीयस्तर परीक्षा १२ मे रोजीराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या राज्यस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षा ही १२ मे रोजी होणार आहे. त्यासाठी निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे.  गतवर्षी एक हजार पैकी ९२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीगतवर्षी महाराष्ट्रातून राष्ट्रीय प्रज्ञाशोध  परीक्षेत राष्ट्रीयस्तरावरील एक हजार विद्यार्थ्यांपैकी ९२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जाणार नसल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजी दिसून येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षाStudentविद्यार्थी