शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

विड्याची तलफ परराज्यातील पानावर; कलकत्ता पानाचे उच्चांकी भाव! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:32 AM

शहरासह ग्रामीण भागात तलफसह जेवणानंतर पचनासाठी विड्याचे  पान खाणार्‍यांची संख्या आजही कमी नाही; मात्र विड्याचे पान खाणार्‍या शौकिनांना  महागाईचा फटका बसला असून, विड्याची तलफ परराज्यातील पानावर भागवली जात  आहे.

गजानन मापारीलोकमत न्यूज नेटवर्कउंद्री : भारतीय संस्कृतीसह आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या विड्याच्या पानाला  आजही कुठलाही धार्मिक विधी, समारंभ, लग्नविधी, जन्म-मृत्यू विधी आदी ठिकाणी  मागणी होत असते. शहरासह ग्रामीण भागात तलफसह जेवणानंतर पचनासाठी विड्याचे  पान खाणार्‍यांची संख्या आजही कमी नाही; मात्र विड्याचे पान खाणार्‍या शौकिनांना  महागाईचा फटका बसला असून, विड्याची तलफ परराज्यातील पानावर भागवली जात  आहे.

आयुर्वेदामध्ये व पचनासाठी खाण्याच्या पानाला अत्यंत महत्त्व असल्याने विड्याच्या  पानाच्या विक्रीची मोठी उलाढाल होते; मात्र या पानाचा प्रवासही मोठा रंजक आहे. पट्टी पान, कलकत्ता पान व बंगला पान या पानांचे मळे व शेती पश्‍चिम बंगालमध्ये असून, क पुरी पानाचे मळे आंध्र प्रदेशात आहेत. पट्टीपान, बंगला पान व कलकत्ता पान हे सर्व  पश्‍चिम बंगालमधून कलकत्ता-नागपूर एक्स्प्रेसने नागपूर येथे येतात व सर्वात मोठी पानाची  बाजारपेठ असलेल्या नागपूर येथून संपूर्ण महाराष्ट्रात पानाचे वाटप करण्यात येते. तर आंध्र  प्रदेशातून पोन्नुर व मद्रास येथून ट्रकने थेट खामगाव विड्याची पाने येत असतात. खामगाव  येथे कपुरी पानासाठी मोठी बाजारपेठ असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते.  यापूर्वी अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्हय़ात बारी समाजाचे नागवेली पानाचे  पानमळे भरपूर होते; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळ व पाणीटंचाईमुळे जिल्हय़ातील  अनेक पानमळे नामशेष झाले. जिल्हय़ात सातपुड्याच्या कुशीत मध्य प्रदेशाच्या  सीमाभागात तसेच अमरावती व जालना जिल्ह्यात तुरळक पानमळे शिल्लक आहेत;  मात्र विड्याच्या पानांची बाहेर राज्यातून मोठय़ा प्रमाणात आयात होत असल्यामुळे  पानांच्या किमतीत वाढ होत आहे.

देठगिणतीने पानांची मोजणी पूर्वीपासून चालत आलेली विड्याच्या पानाची मोजणी देठगिणतीने होते.  प्रत्येक पेटार्‍या तील पानाची मोजणी ही देठगिणती पद्धतीने होते; परंतु गुटख्याच्या प्रकारामुळे पान  खाण्याकडे युवा पिढीचा कल कमी आहे, तर सध्या देठगिणतीनुसार १00 कलकत्ता पट्टी  पानासाठी ४00 ते ४५0 रुपये मोजावे लागत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा