ते मेहकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये भाई कैलास सुखधाने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ॲड. अनंतराव वानखेडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विलासराव चनखोरे, भास्करराव काळे, सुदेश पाटील लोढे, भूषण भैया देशमुख, दिलीप भोजराज, भाई सोमचंद्र दाभाडे, राजेश मापारी, साहेबराव पाटोळे, बादशा खान, जयचंद बांठिया, ॲड. निकस, शैलेश बावस्कर, कलीम खान, सोपानराव देबाजे, आफताब खान, मधुसुदन भटकर, डी. जी. गायकवाड, पंकज हजारी, प्रा. विनोद पऱ्हाड, नारायण पचरवाल, निसार अन्सारी, तानाजी वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ४ वाजता बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, लक्ष्मण घुमरे, देवानंद पवार, भूषण मापारी, नितीन शिंदे, शेख रौप, डॉ. ताजने, रमजान गवळी, अबेद खान, संतोष मापारी आदींनी पक्ष कार्यालयात येऊन कैलास सुखधाने यांचा सत्कार केला. (वा.प्र.)
कर्तृत्व, वक्तृत्व, दातृत्वातून नेतृत्व फुलते : उमाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST