शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष नेत्यानेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी मदत करावी- यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:47 IST

उपरोधीक टोला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दहा जुलै रोजी बुलडाणा येथे लगावला.

बुलडाणा: कोवीड संसर्गाचे राजकारण न करता विरोधी पक्षनेत्याने केंद्राकडून हे संक्रमण रोखण्यासाठी निधी व अन्य मदत मिळवून देण्यासाठी मदत करावी, असा उपरोधीक टोला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दहा जुलै रोजी बुलडाणा येथे लगावला.बुलडाणा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाशी संबंधित विविध कामांचा आढावा घेण्यासाठी त्या बुलडाणा येथे आल्या होत्या. कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. खामगावचे भाजपचे आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी जिल्हा प्रशासनामुळेच कोरोना संक्रमण जिल्ह्यात वाढल्याचा केलेले आरोप व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव खान्देश येथे कोवीड संदर्भात राज्य शासनाच्या धोरणावर केलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारणा केली असता त्यांनी हा टोला लगावला.यावेळी यशोमती ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला. ट्रम्पचे स्वागत आणि मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठीच मोदींनी देशात उशिरा लॉकडाऊन लावला. तो जानेवारीतच लावला असता तर देशात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसता असे त्या म्हणाल्या. सोबतच केंद्र सरकारकडूनच राज्याला मदत व सहकार्य मिळत नाही. विरोधी पक्षनेते राज्य शासनावर ऐवढी टिका करत आहे तर त्यांनीही केंद्र सरकारकडे महाराष्ट्राला कोवीडसाठी निधी व अन्य सहकार्य करण्यासाठी भुमिका निभावून मदत करावी, असे आव्हानच एक प्रकारे त्यांनी दिले. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकारमधील एकंदरीत संबंध चांगलेच ताणल्या गेलेले आहेत, हे यावरून स्पष्ट होत आहे.मुख्यमंत्र्यांमुळेच महाविकास आघाडीचे जुळतेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठ्या मनाचे आहेत. ते मुख्यमंत्री आहेत म्हणूनच आमच महाविकास आघाडीत जुळत आहे, असेही महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. महाविकास आघाडीत जुळवून घेणे जमते का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ही बाब अधोरेखीत केली.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणbuldhanaबुलडाणा