शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातून बॅग लंपास करणाऱ्यांना एलसीबी पथकाने केले जेरबंद, सात जण फरार

By अनिल गवई | Updated: March 20, 2023 19:26 IST

वाहनात आढळले दरोडा टाकण्याचे साहित्य

खामगाव: येथील गांधी चौकातून एका दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाखाची बॅग लंपास करणाऱ्या गुजरातमधील एका गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव-बाळापूर रोडवरील एका शेतात दरोड्याचा कट रचत असलेल्या या टोळीतील तिघांना बेडया ठोकल्या असून, त्यांच्या ताब्यातून एका आलीशान कारसह, एक मोटारसायकल आणि दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस आल्याचे समजतात छर्रा गॅग नावाने प्रसिध्द असलेल्या टोळीतील सात जण फरार झाले आहेत.

खामगाव शहरातील गांधी चौकातून १६ मार्च रोजी एका दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाखाची बॅग लंपास करण्यात आली. चोरी करणारे भामटे सिसी कॅमेऱ्यात कैद झाले. त्या आधारे पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून चोरट्यांच्या शोधासाठी वेगवेगळे पथक तयार केले होते. दरम्यान रविवारी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याचे पथक शेगावातील लॉजेस व हॉटेलची तपासणी करीत असतांना शेगाव- बाळापूर रोडवरील एका शेतात आलीशान कारसह, दुचाकी असलेले काही जण अंधारात थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

यात सात जण घटनास्थळावरून फरार झाले तर पोलिसांनी यावेळी अजयकुमार अशोकभाई तमचे (४२), जिगनेश दिनेश घासी (४४), रितीक प्रविण बारंगे (२३) सर्व रा. अहमदनगर गुजरात यांना पकडले. त्यांच्याकडून तवेरा (क्र. जीजे १ डीए६८८२) गाडी जप्त केली. या गाडीची झडती घेतली असता त्यात मोटर सायकलवर बनावट नंबर बनविण्यासाठी लागणारे साहित्य रेडीयम ०स्टिक र वाहनाचे लाक तोडण्यासाठी अनुकुचीतदार टी, दोन चाकू, चार पेचकस, एक कैची, मिरची पावडर यासह नगदी ८५ हजार रु., एक मोटारसायकल, एक मोबाईल असे साहित्य जप्त केले.खामगावातील ६ लाखाच्या बॅग चोरीची कबूलीचोरट्यांनी खामगावातील चोरीची कबुली दिली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, डिवायएसपी अमोल कोळी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अमलदार गणेश किनगे, केदार फाळके, अजिस परसुवाले, मधुकर रगड, गणेश पाटील, पुरुषोत्तम अघाव, वैभव मगर, विजय सोनुने, सुरेश भिसे यांनी केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी