आधारभूत किमतीने तूर खरेदीचा शुभारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:22 PM2020-02-10T16:22:37+5:302020-02-10T16:22:47+5:30

तूर खरेदीचा शुभारंभ आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Launch Tur procurment at Basic Price! | आधारभूत किमतीने तूर खरेदीचा शुभारंभ!

आधारभूत किमतीने तूर खरेदीचा शुभारंभ!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथे किमान आधारभूत हमी किंमतीने तूर खरेदीचा शुभारंभ आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खरेदी विक्री संस्थचे अध्यक्ष बाबुराव लोखंडकार, कृउबास संचालक दिलीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, महेंद्र रोहणकार, मनोहरसिंग बोदडे, दत्ता पाटील, कृउबास सचिव मुकूटराव भिसे, मोरेश्वर पाटील, संदीप पेठकर, अशोक डोंगरदिवे, सांरगधर भिसे, संभा तासतोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र शासनाच्या सन २०१९-२० प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमीभावाने तूर खरेदीचा शुभारंभ केल्यानंतर आमदार आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी अशी शेतक-यांना हमीभाव देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर या पिकाला ५८०० रूपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी आणावाए असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी यावेळी केले.
यावेळी निलेश काळणे, भागवत ठाकरे, भास्कर देशमुख, प्रदिप देशमुख यांच्यासह अनेक शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली. शुभारंभ प्रसंगी तूर विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांचा सत्कार आमदार आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
 

शेतकºयांनी योजनेचा लाभ घ्यावा!
केंद्र शासनाच्या सन २०१९-२० प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमीभावाने तूर या पिकाला ५८०० रूपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांनी बाहेर कमी भावाने विक्री करण्याऐवजी आपला माल खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी आणावा असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले.

Web Title: Launch Tur procurment at Basic Price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.