शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीचा वेग वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:01 IST

समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी, अशी मागणी केली आहे

ठळक मुद्दे७४१ हेक्टर जमिनीची खरेदीजमीन खरेदीत तफावत होत असल्याचा खासदारांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य सरकारच्या प्लॅगशीप प्रोग्रामपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम आता अधिक वेगात होणार असून, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांची जवळपास ७४१ हेक्टर अर्थात जवळपास ५९ टक्के जमीन  खरेदी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, यापोटी शेतकºयांना ४७१ कोटी ४४ लाख रुपयांचा मोबदला दिला गेला आहे. दुसरीकडे या महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी, अशी मागणी केली आहे.डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गासाठी प्रतिदिन २५ हेक्टर जमीन खरेदीचे लक्ष्य जिल्हा प्रशासनाने निश्चित केले होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकाºयांना निर्देशही दिले होते. भूमी अभिलेख कार्यालयाने जमीन संपदनासंदर्भात मोजणीची असलेली मोठी अडचण दूर करण्यासाठी मैदानात उडी मारली होती; मात्र अपेक्षित वेग यंत्रणेला राखता आला नव्हता. खातेफोड, एकत्रीकरणाची अडचण, सात-बारामधील चुकांमुळे जमीन संपादनाचा वेग मंदावला होता. त्या उपरही ५ मार्चअखेर जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी ९ डिसेंबरच्या २०१७ च्या तुलनेत दुपटीने जमीन संपादित केली आहे.  या रस्त्यासाठी प्रत्यक्षात १ हजार २५७ हेक्टर जमीन संपादित करावायची असून, आजच्या तारखेत ७४१ हेक्टर जमीन संपादित झाली आहे. त्याची टक्केवारी ५९ टक्के आहे. जिल्ह्यात ८७.२९ किमी लांबीचा हा रस्ता आहे.

प्रत्यक्ष कामास मात्र विलंब!फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील या रस्त्याच्या कामास प्रारंभ होणार होता. निर्धारित लक्ष्याप्रमाणे प्रत्यक्षात जिल्ह्यात रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील डोणगावपासून ते देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगावपर्यंत बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीतून हा महामार्ग जात असून, त्याची लांबी ८७.२९ किमी आहे. आता प्रशासकीय यंत्रणा जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम वेगाने व्हावे, यासाठी जोर लावत आहे. त्यातूनच हा वेग वाढत आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची जाधवांनी घेतली भेटया प्रश्नी खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मुंबई गाठून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. सोबच मेहकर तालुक्यातील फैजलापूर  हे गाव पैनगंगेच्या नदीतीरावर असून, तेथे ऊस, केळी यासारखी बागायती पिके गेल्या २० वर्षांपासून घेतली जात असल्याने राज्यमंत्र्यांच्या त्यांनी निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी कागदपत्रांची खातरजमाही करण्याचे त्यांनी सूचित केले आहे. यासोबतच अन्य कागदपत्रेही उपलब्ध करून दिली आहेत. या प्रश्नी आपण चर्चा करू, असेही ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तफावतबुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यातून हा मार्ग जात आहे; मात्र या मार्गासाठी जमीन खरेदी-विक्री करतानाच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप खुद्द खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव, चायगाव, शिवपुरी आणि देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथील शेतकºयांना रेडीरेकनर व बाजार भाव कमी असल्यामुळे मोबदला कमी दराने मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या गावामधील खरेदी-विक्री व्यवहार विचारात न घेता शेजारील लगतच्या गावातील दर लागू केल्यास शेतकºयांना योग्य मोबदला मिळू शकतो, असे खा.  जाधव यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गPrataprao Jadhavप्रतावराव जाधव