शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन

By अनिल गवई | Updated: November 1, 2023 15:11 IST

कृउबास सभापती आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धान्यखरेदीला पूर्ववत सुरूवात करण्यात आली.

खामगाव: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुलभूत सुविधांअभावी हमाल, मापारी आणि अडत्यांनी बुधवारी दुपारी धान्य खरेदी बंद करीत समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कृउबास सभापती आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धान्यखरेदीला पूर्ववत सुरूवात करण्यात आली. या प्रकारामुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रस्त्यांचा अभाव आहे. धान्याचे शेड उंच असल्यामुळे हमाल आणि मापार्यांना त्रास सहन करावा लागतो. धान्याचे ट्रक आणि वाहने रस्त्याने जात असताना धूळ आणि गिट्टी उडून हमाल जखमी होतात. यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक हमाल, अडते आणि व्यापार्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान, धान्य खरेदी बंद पाडली होती. या प्रकारामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली होती. चर्चेनंतर दुपारपासून धान्य खरेदीला सुरूवात करण्यात आली.

राजकीय विरोधातून कृषीण उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या विकास कामासोबतच इतरही कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुलभूत सुविधांचे काम रखडले आहे. याप्रकरणी न्यायालयीन स्तरावरून लढा सुरू आहे. लवकरच ही विकासकामे तडीस नेली जातील.सुभाष पेसोडे, सभापती, कृउबास, खामगाव.

काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आणि मित्र पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत यश संपादन केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्यांसाठी ही चपराक आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून राजकीय कुरघोडीतून विकास कामांना अडथळा िनर्माण केल्या जात आहे. लवकरच यावर तोडगा निघेल.िदलीपकुमार सांनदा, माजी आमदार

कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शेतकरी आणि हमाल, मापार्यांसोबतच व्यापार्यांनाही त्रास होतो. रस्त्या अभावी हमालांना त्रास होतो. याकडे त्वरीत लक्ष न दिल्यास, दिवाळीनंतर कायम स्वरूपी खरेदी बंद करण्याचा निर्धार आहे.अविनाश सोनट्टके, अडते, कृउबास खामगाव.

राजकारण बाजूला ठेवून हमाल आणि व्यापार्यांना सुविधा उलब्ध करून द्याव्यात. यासाठी विरोधी आणि सत्ताधार्यांनीही एकत्र यावे, समस्यांवर तोडगा काढून, शेतकरी आणि हमालांना न्याय देण्यात यावा. िवकास कामासाठी स्थगितीही उठविली जावी.नथ्थू मोरे, प्रभारी जिल्हाध्यक्ष, हमाल, मापारी संघटना, खामगाव.

टॅग्स :agitationआंदोलनbuldhanaबुलडाणा