शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये ‘कृषी सारथी’चा शेतकऱ्यांना आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 20:16 IST

Khamgaon News : तरूणाई ‘कृषी सारथी’च्या माध्यमातून पश्चिम विदर्भातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि सामान्यांच्या मदतीला धावली आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत रोजगार हिरावलेल्या अनेकांच्या रोजगारासोबतच समुपदेशनासाठी पुढाकार घेणाºया तब्बल ८१ पेक्षा अधिक युवकांचे अविरत ‘परिश्रम’चा आता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आधार ठरताहेत. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरूणाई ‘कृषी सारथी’च्या माध्यमातून पश्चिम विदर्भातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि सामान्यांच्या मदतीला धावली आहे. शेतकºयांचे समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी तयार झालेल्या मोबाईल अ‍ॅपचा अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वापर केला जात आहे. कोरोना काळात हतबल झालेल्या शेतकºयांनाच नव्हे तर नोकरी गमविलेल्या हजारो बेरोजगारांना नोकरीसाठी तसेच समुपदेशानाही ‘कृषी सारथी’ आता खरा आधार बनला आहे.  शेतकºयांनी पिकविलेला भाजीपाला आणि फळांना ग्राहक मिळवून देण्यासोबतच शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषी सारथी प्रयत्नशील आहे. कृषी सारथीचे ८१ पेक्षा अधिक समन्वयक शेतकºयांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी झटताहेत. त्याचवेळी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील  तरूण मातृशक्ती कृषी सारथीच्या तंत्रज्ञानाची, शेतकरी, शेतमजूर, त्यांचे पाल्य तसेच शेतकरी महिला, महिला मजूर आणि त्यांच्या पाल्यांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर, शेती पदवीधर, वकील, शिक्षक आणि पत्रकार देखील सामाजिक दायित्व म्हणून शेतकरी आणि गरीबांच्या उत्थानासाठी झटताहेत.

 मातृशक्तीच्या हाती तंत्रज्ञानाची धुरा!- लॉकडाऊन...संचारबंदी आणि कडक निर्बंधाच्या कालावधीत शेतकºयांनी पिकविलेली विविध फळे आणि भाजीपाल्याच्या विक्रीसाठी शेती उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘कृषी सारथी’ने  पुढाकार घेतला. शेतकरीच नव्हे तर शेतकरी पाल्य आणि कोरोनामुळे नोकरी गमविलेल्यांचा आधार होण्यासाठी तंत्रज्ञानाची धुरा नम्रता यावले, डॉ. शीतल निर्मळ, गौरी काळे, साक्षी तायडे, चेतना देशमुख, प्रगती भोपळे, मयुरी भोवाटे, स्वाती जावरे, ऋचा मेंढे, मयुरी भोगे, विनल आमझरे, प्राची रहांगडाले, अपूर्वा कवाले, अपूर्वा बेंद्रे, सदफ साजिद, प्रेमलता चव्हाण, राधिका पाथरकर, शरयू डहाके, अवंती देवतळे, श्वेता जोशी, कल्याणी बाटले, पूजा करांगळे, शिवानी उदगीरकर, संकेत शेगोकार (गोंधनापूर)यांनी हाती घेतली आहे.

 कृषी सारथी शेतकरी ग्रुपद्वारे समुपदेशन!- कोरोना काळात कृषी विषयक मार्गदर्शन, बाजारपेठ आणि प्रत्यक्षविक्रीसोबतच शेतकरी, शेतकरी पाल्य आणि कोरोना काळात नोकरी गमविलेल्यांना या ग्रुपद्वारे मार्गदर्शन, समुपदेशन केले जात आहे. यामध्ये शेतकºयांना कृषी सहायक, कृषी अधिकारी, कृषी सेवक, हवामान तज्ज्ञ, प्रसिध्द समुपदेशक, पोलिस अधिकाºयांच्या तसेच लेखक आणि तत्वज्ञांचा समावेश आहे. पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तरुणाईचा या उपक्रमाला हातभार लागत आहे.

 शेतकºयांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरूवातीला कृषी सारथी अ‍ॅपची निर्मिती केली. याद्वारे शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांचे समपुदेशन आणि बेरोजरांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. कोरोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी कृषी सारथी आधार ठरत आहे.- परशराम आखरेसमन्वयक, कृषी सारथी, अमरावती. संत्र्याचे पिक आल्यानंतर लॉकडाऊन लागला. त्यामुळे संत्री शेतातच पडून होती. अशातच मित्राने कृषी सारथीची माहिती दिली. लगेचच कृषी सारथीच्या संपर्कात आलो. त्यांनी घरपोच संत्रा विक्रीस मदत करीत आर्थिक आणि मानसिक संकटातून वाचविले.- शेखर लांडगेसंत्रा उत्पादक शेतकरी, करजगाव, जि. अमरावती.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी