शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

कृषी संजीवनीचा शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 14:50 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जिल्ह्यातील ६६६ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.

 योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतीसोबतच पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जिल्ह्यातील ६६६ शेतकºयांना लाभ मिळाला आहे. यापोटी १ कोटी ६० लाख ३४ हजार ४५८ रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. सिंचन सुविधांपासून ते गटशेतीपर्यंतचे उपक्रम याअंतर्गत राबविण्यात येऊन शेतकºयांचा आर्थिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.सद्य: स्थितीत शेती बेभरवशाची झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अति तर कधी खूप कमी पाऊस झाल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास अनेकदा हिरावून घेतल्या जातो. कसाबसा सावरून बळीराजा दरवर्षी नवीन स्वप्ने पाहून आनंदात पेरणी करीत असतो. मात्र अनेक वेळा पेरणीसाठी लागलेला खर्चही हाती आलेल्या उत्पादनातून निघणे कठीण असते. यामुळे शेतकरी नेहमी आर्थिक विवंचनेत असतो. या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वीत केली आहे. जिल्ह्यात या योजनेला शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत ३९६ गावांमधील ६६६ लाभार्थ्यांना १ कोटी ६० लाख ३४ हजार ४५८ रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.यामध्ये परसातील कुक्कुटपालन ७, शेततळे १६, ठिबक सिंचन ३०, पीव्हीसी/एचडीपीई पाइप १९२, शेडनेटमधील लागवड साहित्य ६, बिजोत्पादन ४, फळलागवड २, बंदिस्त शेळीपालन २४२, तुषार सिंचन २३, इलेक्ट्रीक मोटार १४१, विहिर पुनर्भरण १ तर शेडनेट या घटकामध्ये २ लाभार्थ्यांचा समावेश आहे.तालुकानिहाय लाभार्थी गावांची संख्यानानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ३९६ गावांमधील लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील १४, चिखली १३, मलकापूर २४, मोताळा २२, जळगाव जामोद ५७, नांदुरा ६९, शेगाव ५९, संग्रामपूर ५८, खामगाव ३०, देऊळगावराजा ६, सिंदखेडराजा १९, मेहकर १० तर लोणार तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना