शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Special : सकाळी व सायंकाळी सुर्यकिरणे शिवलिंगावर पडणारी कोथडीची मंदिरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:55 IST

Shravan Special : मोताळा तालुक्यातील कोथडी येथे दोन दगडी बांधकाम असलेली महादेवाची मंदिरे आहेत.

- विवेक चांदूरकर खामगाव : मोताळा तालुक्यातील कोथडी येथे दोन दगडी बांधकाम असलेली महादेवाची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये सकाळी व सायंकाळी सुर्यकिरणे शिवलिंगावर पडतात. या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते.       कोथडी गावात महादेवाची दोन मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरांचे प्रवेशव्दार विरूद्ध दिशेने आहे. एक मंदिर गावामध्ये असून, दुसरे गावाबाहेर आहे. गावाबाहेर चिंतामणी मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम पूर्णता दगडामध्ये केले आहे. या मंदिरात सायंकाळी सुर्य मावळताना सुर्यकिरणे शिवलिंगावर पडतात. या मंदिराचे छत पडल्याने नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. मंदिरातील दगडी खांबावर विविध नक्षी कोरली आहे. तसेच गावात एक महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर सुंदर मूर्ती, शिल्प व नक्षीकलेने संपन्न आहे. या मंदिराचे बांधकाम सुद्धा दगडांमध्ये करण्यात आले आहे. मंदिराच्या समोर दगडांपासून बांधकाम केलेला ओटा आहे. मंदिराच्या चहुबाजुने यक्षाचे शिल्प कोरले आहे. हे यक्ष मंदिराच्या भार आपल्या खांद्यावर घेवून आहेत. तसेच चहुबाजुने दगडावर सुरेख नक्षी कोरली आहे. मंदिराच्या आतमध्ये मुख्य गाभाºयासह दोन उपमंदिरेही आहेत. मुख्य गाभाºयात शिवलिंग आहे. सकाळी सुर्य उगवताना शिवलिंगावर सुर्यकिरणे पडतात. मंदिराच्या प्रवेश्वदारावर बारीक मूर्ती व शिल्प कोरण्यात आले आहे. येथे विष्णू व सुरसुंदरींचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार बघून प्राचीन मूर्तीकार किती निपूण होते व मूर्तीकला किती विकसित होती, याचा प्रत्यय येतो. तसेच गाभाºयाच्या प्रवेशव्दारावरही अप्रतिम मूर्ती व शिल्प कोरले आहे. या मूर्ती व शिल्पांमधून हिंदू संस्कृतीच तेथे साकारण्यात आली आहे. विविध प्रसंग मूर्तीरूपाने दाखविण्यात आले आहे. मंदिराचे छत आतून कोरीव आहे. छतावर सुद्धा सुंदर नक्षी कोरली आहे. मंदिराच्या समोर काही खांब अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत. येथे आधी सभामंडप असायला हवा.  मंदिराच्या चहुबाजुने असलेल्या दगडांवर बारीक नक्षीकाम केले आहे.     या मंदिरांचे बांधकाम बाराव्या शतकात झाले असावे, असा अंदाज आहे. बाराव्या शतकात देवगिरीचे (सध्याचे दौलताबाद) राजे रामदेवराव व कृष्णदेवराव यादव यांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मंदिरांचे बांधकाम करण्यात आले. यादव काळात बांधण्यात आलेल्या मंदिरात हेमाडपंथी मंदिरेही म्हणतात. या काळात मंदिर बांधकामाची नवीन शैली विकसित झाली होती. तसेच त्यांच्या काळात सर्वत्र समृद्धता नांदत असल्याने अनेक मंदिरांचे बांधकाम करण्यात आले. यादव शैव पंथीय असल्यामुळे त्यांनी महादेवाची मंदिरे बांधली. ही दोन्ही मंदिरे बघायला अनेक पर्यटक व अभ्यासक येतात. तसेच श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलkhamgaonखामगाव