शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

कोद्री येथील ३० कुटूंबांचा  मतदानावरील बहिष्कारावर कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 14:51 IST

संग्रामपूर: तालुक्यातील कोद्री येथील ३० कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत त्यांनी मतदान केले नसल्याचे दिसून आले. 

संग्रामपूर: तालुक्यातील कोद्री येथील ३० कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत त्यांनी मतदान केले नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी यांना श्रीराम खोंड व घरकुलापासून वंचित लाभार्थ्यांनी निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. यावर प्रशासनाकडून तोंडगा काढण्यात न आल्याने येथील घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेले ३० कुटुंबीय मतदानाच्या बहिष्कारावर ठाम आहेत. बहुचर्चित संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथे घरकुल वाटपात अफरातफर करून बनावट कागद पत्राच्या आघारे अपात्राला लाभ दिल्याप्रकरणी येथील तत्कालीन ग्रामसेवक डोंगरे यांच्या निलंबनानंतर आता दुसºया तत्कालिन ग्रामसेवकावर कर्तव्यात कसुरचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नोटीस बजावून मोकळे झालेले प्रशासन कार्यवाही करण्यास तयार नसल्याने येथील वंचित लाभार्थी आक्रमक झाले. कोद्री येथील नागरिकांनी गेल्या एका वषार्पासून न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवुन आंदोलने केली. परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक येथील घरकुल घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत झालेला प्रकार दाबण्याचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखले असून घरकुल वाटप अफरातफर प्रकरणी काही दिवस आधी एका ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले. तर दुसºया तत्कालीन ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. २७ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी ए. एल. बोंद्रे यांनी एका पत्रकाद्वारे तत्कालिन ग्रामसेवक एस.यु.बेलोकार यांना कोद्री येथील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपामध्ये अनियमितता केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिली. परंतु कारवाई करण्यात आली नाही तसेच  वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचे पाऊले उचलण्यात न आल्याने येथील वंचित लाभार्थ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला. तरीही प्रशासनाने येथील घरकुल प्रकरण गंभीरतेने न घेतल्याने गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर येथील ३० कुटुंबीयांनी बहिष्कार कायम ठेवल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)

आमचा घरकुलाचा प्रश्न सुटला नसल्याने आम्ही ३० कुटूंबांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे जाहिर केले होते. अद्याप समस्या तशाच असल्याने मतदान करणार नाही.श्रीराम खोंडमतदार, कोद्री ता.संग्रामपूर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkhamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरbuldhana-pcबुलडाणा