शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून युवकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:46 IST

Crime News शेख शफीक शेख शब्बीर याने २३ डिसेंबरच्या रात्री ज्ञानेश्वर मोरे याच्यावर चाकू हल्ला केला.

ठळक मुद्दे हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. आरोपी शेख शफीक शेख शब्बीर विरोधात गुन्हा दाखल.

 लाेकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: किरकोळ वादातून डोणगाव येथे बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास  एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव ज्ञानेश्वर मोरे असे आहे. चाकू हल्ल्यात त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास प्रथम डोणगाव व तेथून मेहकर, बुलडाणा व शेवटी अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.  पोलिसांनी आरोपी शेख शफीक शेख शब्बीर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर गजानन मोरे याचा व शेख शपीक शेख शब्बीर यांच्यात किरकोळ वाद होता. त्याचा राग मनात धरून शेख शफीक शेख शब्बीर याने २३ डिसेंबरच्या रात्री ज्ञानेश्वर मोरे याच्यावर चाकू हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास त्याच्या वडिलांनी डोणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास तेथून मेहकर व नंतर बुलडाणा येथे पाठविण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यास अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेची ज्ञानेश्वर मोरेचा चुलत भाऊ सागर रघुनाथ मोरे याने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख शफीक शेख शब्बीर विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक नरोटे हे करीत आहेत. दरम्यान, या दोघांमध्ये नेमका कुठल्या कारणावरुन वाद झाला होता ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी