शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील आॅटो चालकांची धरपकड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 13:48 IST

खामगाव:  शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून शहर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देमुख्य रस्त्यावर तसेच विविध चौकात आॅटोची कागदपत्र  तपासणी मोहिम राबविण्यात आली. तपासणी दरम्यान, कागदपत्र नसलेले २३ आॅटो शहर पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आले. यापैकी बहुतांश आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

खामगाव:  शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून शहर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आॅटो चालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. 

 शहर पोलिस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी मुख्य रस्त्यावर तसेच विविध चौकात आॅटोची कागदपत्र  तपासणी मोहिम राबविण्यात आली. तपासणी दरम्यान, कागदपत्र नसलेले २३ आॅटो शहर पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आले. यापैकी बहुतांश आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये वाहतूक शाखेचे एएसआय अरविंद राऊत, मार्गरेट हंस, वाहतूक पोलिस योगेश चोपडे, संजय इंगळे, हागे, टेकाळे, नागरे यांनी ही कारवाई केली.

 

कारवाईमुळे आॅटो चालकांमध्ये धास्ती!

शहराच्या विविध भागात ही कारवाई सुरू असताना बस स्थानक चौकातील आॅटो धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अनेक आॅटो चालकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणणेच पसंत केल्याचे चित्र दुपाºयाच्या वेळी दिसून आले.  शहर पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट, अल्पवयीन वाहन चालकांसोबतच विना परवाना वाहन चालविणाºयांविरोधात मोहिम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांवर कारवाई करण्यात आली.  

शहरातील वाहतुकीला वळण लावण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये बेशिस्त वाहन धारकांवर कारवाई केली जात आहे. बुधवारी या मोहिमेत आॅटो चालकांवर कारवाई करण्यात आली.

- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस