शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

खामगावकरांना पाण्याची प्रतीक्षा कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 16:12 IST

खामगाव : पाईपलाईन दुरूस्तीचा तांत्रिक पेच न सुटू शकल्याने, बुधवारी सायंकाळपर्यंत खामगाव शहराचा पाणी पुरवठा असुरळीत होता. परिणामी, तब्बल १५ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प असून, खामगावकरांची पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : पाईपलाईन दुरूस्तीचा तांत्रिक पेच न सुटू शकल्याने, बुधवारी सायंकाळपर्यंत खामगाव शहराचा पाणी पुरवठा असुरळीत होता. परिणामी, तब्बल १५ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प असून, खामगावकरांची पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येते. पाईपलाईनची तांत्रिक दुरूस्ती लांबणीवर पडल्याने आता गुरूवारी सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

खामगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया गुरूत्त्व वाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून खामगाव शहरात पाण्याचा ठणठणाट असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासोबतच वापराचेही पाणी विकत घ्यावे लागत आहे. दरम्यान, मंगळवारी दुरूस्ती पूर्णत्वास आल्यानंतर पाईपलाईनवरील एक जोड पुन्हा निसटला. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि पालिकेने तातडीने  हा जोड दुरूस्तीचे काम पूर्णत्वास नेले. सारोळा शिवारातील नदीपात्रातील जोड दुरूस्तीपूर्णत्वास आली. मात्र, सिमेंटीकरणामुळे तसेच तांत्रिक तपासणीमुळे बुधवारी खामगाव शहराला पाणी पुरवठा होवू शकला नाही. 

नागरिकांमध्ये तीव्र संताप!

विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागात तब्बल तीन आठवड्यांपासून पाणी पुरवठा असुरळीत आहे. त्या भागात नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. पाणी पुरवठा लांबणीवर पडल्यामुळे नागरिकांवरील आर्थिक भुर्दंड वाढत आहे.

गळती दुरूस्तीचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. पाईपलाईनची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळपासून शहरात नियोजनानुसार पाणी पुरवठा सुरळीत केल्या जाईल. ज्या भागात ब्रेकडाऊन झाला होता. तेथूनच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.

- प्राजक्ता पांडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगावWaterपाणी