शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: मार्निंग वॉक करणाऱ्यांकडून गिरविले योगाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:29 IST

मॉर्निंग वॉक करणाºयांना शहर पोलिस स्टेशन समोर योग करायला लावून अनोखी शिक्षा देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संचारबंदी काळात शहरातील विविध रस्त्यांवर मॉर्निंग वॉक्साठी बाहेर पडणाºयांना शुक्रवारी शहर पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला. मॉर्निंग वॉक करणाºयांना शहर पोलिस स्टेशन समोर योग करायला लावून अनोखी शिक्षा देण्यात आली. तर दुचाकीने अकारण फिरणाºयांवर १७५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. खामगाव शहरातही कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाइी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना दुचाकी वाहने वापरण्यास  मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील शहरात दुचाकींचा वापर थांबत नसल्याने संचारबंदी काळात दररोज नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना संचारबंदी लागू झाल्यापासून शुक्रवार २४ एप्रिलपर्यंत शहर आणि परिसरातील १२३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अकारण फिरणाºयांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मदत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावेळी योग्य कारण सांगणाºयांना तसेच शेतकºयांना कारवाईतून वगळण्यात आले.

अनेकांनी गिरविले योगाचे धडे!संचारबंदी काळात मॉर्निग वॉक करताना आढळून आलेल्यांना शहर पोलिस स्टेशनमध्ये स्थानबध्द करण्यात आले. शहराच्या विविध भागातील नागरिकांचा यामध्ये समावेश असल्याने पोलिस स्टेशनच्या आवारात एकच गर्दी झाली. त्यामुळे या नागरिकांना सोशल डिस्टसिंगचे पालन करीत शहर पोलिस स्टेशन समोर रांगेत बसविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून योगाचे धडे गिरविण्यात आले. यावेळी अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना!सकाळी ८ ते १२ या वेळेत शहरातील नांदुरा रोडवर तसेच विविध चौकात नागरिकांची गर्दी होते. नागरिक एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडतो. वाढत्या गर्दीबाबत येत असलेल्या तक्रारींमुळे शुक्रवारी शहर पोलिसांनी कारवाईचा फास आवळला.

वारंवार सूचना देऊनही काहीजण संचारबंदी काळात बाहेर फिरताना आढळून येत आहेत. काही जण मॉर्निंग वॉकसाठीही बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शुक्रवारी तब्बल १७५ जणांवर कारवाई करण्यात आली.- सुनिल अंबुलकरपोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस